MWC 2024 Updates eSakal
विज्ञान-तंत्र

MWC 2024 Updates : सॅमसंगची स्मार्ट रिंग, वनप्लसची स्मार्टवॉच अन् ओप्पोचे स्मार्ट ग्लासेस.. टेक इव्हेंटमध्ये काय काय झालं लाँच?

Galaxy Ring : सॅमसंगने जानेवारीमध्ये आपल्या 'गॅलेक्सी अनपॅक्ड' इव्हेंटमध्ये गॅलेक्सी रिंगचा टीझर प्रसिद्ध केला होता. तेव्हापासूनच यूजर्सना या रिंगची उत्सुकता लागून होती.

Sudesh

Mobile World Congress 2024 : बार्सिलोनामध्ये सध्या जगातील सर्वात मोठ्या टेक इव्हेंटपैकी एक असणारा इव्हेंट सुरू आहे. 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस' असं नाव असणाऱ्या या इव्हेंटमध्ये कित्येक दिग्गज टेक कंपन्यांनी आपली नवीन उत्पादने सादर आणि लाँच केली आहेत. यामध्ये सॅमसंग, ओप्पो, वनप्लस या कंपन्यांनी आपापले स्मार्ट डिव्हाईसेस सादर केले आहेत.

गॅलेक्सी रिंग

सॅमसंगने जानेवारीमध्ये आपल्या 'गॅलेक्सी अनपॅक्ड' इव्हेंटमध्ये गॅलेक्सी रिंगचा टीझर प्रसिद्ध केला होता. तेव्हापासूनच यूजर्सना या रिंगची उत्सुकता लागून होती. अखेर MWC इव्हेंटमध्ये सॅमसंगने ही रिंग सादर केली आहे. Galaxy Ring या स्मार्ट अंगठीमध्ये सॅमसंगने कित्येक एआय फीचर्स दिले आहेत. विशेष म्हणजे सॅमसंगने या रिंगचे विविध प्रोटोटाईप सादर केले आहेत.

गॅलेक्सी स्मार्ट रिंग ही स्लीप ट्रॅकिंग, हार्ट रेट ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन रेट, डेली एक्सरसाईज ट्रॅकिंग यासोबतच अन्य गोष्टीही सातत्याने ट्रॅक करत राहते. यूजरच्या आरोग्यासंबंधी वेळोवेळी नोटिफिकेशन्स पाठवण्याचं कामही गॅलेक्सी रिंग करते. या रिंगला 2024 च्या अखेरीपर्यंत लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. सॅमसंगने तीन रंगांमध्ये गॅलेक्सी रिंग सादर केली आहे.

वनप्लस वॉच

वनप्लस कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपली नवीन स्मार्टवॉच लाँच केली. OnePlus Watch 2 असं या स्मार्टवॉचचं नाव आहे. यामध्ये 1.43 इंच मोठा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे 100 तासांचा बॅटरी बॅकअप. यामध्ये कित्येक स्मार्ट फीचर्स दिले आहेत. यातील ड्युअल ओएस फीचर हा चर्चेचा विषय ठरत आहे. ब्लूटूथ कॉलिंगसाठी यात स्पीकर आणि मायक्रोफोन देखील दिला आहे. ही वॉच भारतात 24,999 रुपयांना उपलब्ध होईल.

ओप्पो एअर ग्लास

Oppo ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपले एआय पॉवर्ड स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. Air Glass 3 XR असं या गॅजेटचं नाव आहे. अवघ्या 50 ग्रॅम वजनांचे हे स्मार्ट ग्लासेस यूजरच्या कम्फर्टसाठी डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये व्हायब्रंट फुल कलर डिस्प्ले, AndesGPT AI Assistant, व्हॉइस कमांड आणि टच इंटरॅक्शन फीचर्स दिले आहेत.

यामध्ये यूजर्स म्युझिक कंट्रोल, कॉल रिसिव्हिंग, फोटोज स्क्रोलिंग असे कित्येक फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये मायक्रोफोन देखील देण्यात आला आहे, तसंच यामध्ये क्लिअर ऑडिओ ऐकण्याची सुविधाही मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींची संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT