Moto Edge 2025 mobile price : मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. Motorola ने त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘Motorola Edge 2025’ अमेरिकेत अधिकृतपणे लॉन्च केला आहे.
हा स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञान, दमदार हार्डवेअर आणि आकर्षक डिझाइनचा उत्तम मिलाफ असून, विशेषतः AI-पावर्ड फिचर्स, नवीन Android 15 सिस्टीम आणि जबरदस्त कॅमेरा सेटअप यामुळे तो एक परिपूर्ण पर्याय ठरतो आहे.
Motorola Edge 2025 मध्ये 6.7 इंचांचा Super HD pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह अधिक स्मूद व्हिज्युअल अनुभव देतो. त्याची ब्राइटनेस क्षमता 4500 निट्सपर्यंत असून, उन्हातही स्क्रिन सहजपणे वाचता येते. Corning Gorilla Glass 7i चं संरक्षण दिल्यामुळे फोन अधिक टिकाऊ आणि मजबूत आहे.
या डिव्हाइसमध्ये MediaTek Dimensity 7400 हा शक्तिशाली चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो. मल्टीटास्किंग, गेमिंग आणि AI बेस्ड फिचर्ससाठी हा प्रोसेसर उपयुक्त ठरतो. हा स्मार्टफोन नवीन Android 15 वर कार्यरत असून यामध्ये नवीन सॉफ्टवेअर आहे.
Motorola Edge 2025 मध्ये एक जबरदस्त ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे
50MP प्रायमरी कॅमेरा
50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा
10MP टेलीफोटो लेंस
सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे, जो हाय क्वालिटी सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग अनुभव देतो.
या स्मार्टफोनला 5200mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली असून ती 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे अतिशय कमी वेळात फोन फुल चार्ज करता येतो हे जास्त वापर करणाऱ्यांसाठी एक मोठं वैशिष्ट्य ठरतंय.
Motorola Edge 2025 एकाच व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज लाँच करण्यात आला आहे. याची किंमत $549 (सुमारे 47,000) असून, 5 जून 2025 पासून विक्रीस उपलब्ध होणार आहे. फोन Deep Forest या एकाच आकर्षक रंगात येतो.
Motorola लवकरच आणखी एक फोन Moto G56 5G सुद्धा लॉन्च करणार आहे. यात 50MP मागचा आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार असून, यामध्ये सुद्धा MediaTek चा प्रोसेसर दिला जाणार आहे.
Motorola Edge 2025 हा फोन केवळ एक अपग्रेड नाही, तर एक परिपूर्ण फ्लॅगशिप अनुभव देणारा डिव्हाइस आहे. AI फिचर्स, पॉवरफुल परफॉर्मन्स, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त कॅमेरा यांचा संगम या फोनमध्ये पाहायला मिळतो. Motorola च्या चाहत्यांसाठी आणि नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.