E - Shram card sakal
विज्ञान-तंत्र

E -Shram card: अर्ज करताना या चुका करु नका, एका चुकीमुळे योजनेपासून राहाल वंचित

ई-श्रम कार्डसाठी अर्ज करत असाल, तर तर या चुका कधीही करू नका. तुमच्या एका चुकीमुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

भारतात कामगारांची मोठी लोकसंख्या आहे. या लोकांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्तरावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नसल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. (never do these mistake during registration of e shram card)

या पार्श्वभूमीवर भारतातील मोठ्या संख्येने लोक ई-श्रम कार्ड मिळविण्यासाठी नोंदणी करत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करत असाल, तर तर या चुका कधीही करु नका. तुमच्या एका चुकीमुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

१.जर तुम्ही ई-श्रम कार्डसाठी अर्ज करणार असाल. या परिस्थितीत, आपण अर्ज करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. नोंदणी करताना चुकीचे तपशील टाकल्यास अशा परिस्थितीत तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.

२. ई-श्रम कार्डसाठी अर्ज करताना तपशील काळजीपूर्वक आणि तंतोतंत भरा. या व्यतिरिक्त, तपशील प्रविष्ट केल्यानंतर, तुम्ही ते एकदा तपासले पाहिजे.

३. जर तुमच्या बँक खात्याचे KYC केले नसेल. अशात तुम्ही तुमच्या बँकेला भेट द्या आणि खात्याचे केवायसी लवकरात लवकर करून घ्या. तुम्ही असे न केल्यास, हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही.

४. तुमच्या बँकेला भेट देऊन तुम्ही सहज केवायसी करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. केवायसी करण्यासाठी, तुम्हाला बँकेला भेट द्यावी लागेल आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करावे लागेल.

५. याशिवाय तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडला पाहिजे. यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT