New Audi Q7 
विज्ञान-तंत्र

New Audi Q7 भारतात लॉंच; फक्त 5.9 सेकंदात गाठते 100 ची स्पीड

सकाळ डिजिटल टीम

लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी (Audi)ने आज भारतीय बाजारपेठेत आपली लेटेस्ट कार न्यू ऑडी Q7 (New Audi Q7) लॉन्च केली आहे. ही लक्झरी कार भारतीय बाजारपेठेत 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामध्ये ऑडी क्यू प्रीमियम-प्लस आणि ऑडी क्यू-टेक्नॉलॉजी व्हेरिएंटचा समावेश आहे. चला तर मग या या लक्झरी कारची किंमत आणि खासियत काय आहे ते पाहूया

व्हेरिएंट आणि किंमत

ऑडी क्यू प्रीमियम-प्लस Audi Q Premium Plus ( - किंमत 79,99,000 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू

ऑडी क्यू-टेक्नॉलॉजी Audi Q Technology - 88, 33,000 लाख रुपये (एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत)

फीचर्स

आधी लाँच झालेल्या ऑडी Q7 च्या तुलनेत त्यात अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. इतर फीचर्समध्ये लेन डिपार्चर वॉर्निंगसह स्टीयरिंग असिस्ट, 360-डिग्री 3डी सराउंड कॅमेरा, इंटिग्रेटेड वॉशर नोझल्ससह अ‍ॅडॅप्टिव्ह विंड स्क्रीन वायपर्स, सेन्सर बेस्ड बूटलिड ऑपरेशनसह कम्फर्ट की, MMI नेव्हिगेशनसह MMI टच रिस्पॉन्स, Bang and Alufssen प्रीमीयम 3जी Sound System, एअर ionizer आणि aromatization सारखे फीचर्स दिले आहेत.

एक्सटिरीएर-इंटेरियर

एक्सटिरीएरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात हायर एअर इनलेट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, हाय ग्लॉस स्टाइलिंग पॅकेज, इंटिग्रेटेड वॉशर नोझल्ससह अडॅप्टिव्ह विंड शील्ड वायपर्स इत्यादी देण्यात आले आहे. दुसरीकडे, ऑडी Q7 चे डिझाईन लॅग्वेजसोबत कॉम्पॅक्ट 48.26 सेमी (R19) 5 आर्म स्टार स्टाइल डिझाइन अलॉय व्हील्स दिले आहेत

कारच्या इंटेरियरमध्ये ड्रायव्हर-अनुकूल कॉकपिट डिझाइन दिले आहे, ज्यामुळे कार चालविणे अत्यंत सोपे होते आणि हाताच्या हालचाली देखील करता येतात. कॉकपिट डिझाइन नव्या डिजिटल ऑपरेटिंग कॉन्सेप्टसाठी अनुकूल आहे, ज्यामध्ये दोन मोठ्या टचस्क्रीन देखील दिल्या आहेत. या कारमध्ये एक इको-फ्रेंडली लाइटिंग पॅकेज देखील देता येईल, जे सरफेस आणि कॉन्टोर लायटिंगसाठी 30 रंगांशी सुसंगत आहे.

सुरक्षेचं काय?

सुरक्षेच्या दृष्टीने ऑडी ही एकदम परफेक्ट कार आहे, यामध्ये सर्वांच्या सुरक्षेचा विचार करून त्यात 8 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की त्याच्या दुसऱ्या रांगेतील सीट एडजस्ट केल्या जाऊ शकतात, त्या एका बाजूला झुकवल्या जाऊ शकतात. तिसर्‍या रांगेतील सीटवर 7 जणांची आसनक्षमता दिली आहे आणि ते इलेक्ट्रिकली दुमडले जाऊ शकतात. केबिनमध्ये नेहमीच 4 झोन एअर कंडिशनिंग, एअर आयोनायझर आणि अॅरोमेटायझेशन देंण्यात आले आहे. स्पीड लिमिटरसोबत क्रूझ कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरासह पार्क असिस्ट आणि स्टीयरिंग असिस्ट सोबत लेन डिपार्चर वॉर्निंग फीचर देण्यात आले आहे.

इंजिन

इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास, ऑडी Q7 मध्ये 3.0-लिटर V6 TFSI 48V माइल्ड हायब्रिड सीस्टीमशी जोडलेले आहे जे 340 होर्स पावर आणि 500 ​​Nm टॉर्क जनरेट करते. यासह, कार 5.9 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. सात ड्राइव्ह मोड, अडॅप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह क्वाट्रो ऑल व्हील ड्राइव्ह बेस्ट परफॉर्मंस आणि हँडलींग अनुभव देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT