nft feature will come soon on Instagram says mark Zuckerberg news report
nft feature will come soon on Instagram says mark Zuckerberg news report  sakal media
विज्ञान-तंत्र

मार्क झुकरबर्गची मोठी घोषणा; इंस्टाग्रामवर लवकरच मिळणार NFT फीचर

सकाळ डिजिटल टीम

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दुनियेत अनेक नवीन गोष्टी येत आहेत. सध्या क्रिप्टोकरंसी आणि NFTs यांच्यासारख्या व्हर्चुअल मालमत्तेत लोक मोठ्या प्रमाणात पैसा गुंंतवत आहेत. टेक जाएंट मेटा कंपनीकडून लवकरच नॉन-फंगीबल टोकन (NFT) चे फीचर Instagram वर उपलब्ध होणार आहे असे सांगितले आहे. या संबंधीचा खुलासा इंस्टाग्रामची मालकी असणारी मेटा या कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केला.

असे म्हटले जात आहे की नॉन फंगीबल टोकन (NFT) सारखे फीचर आणण्यासाठी Instagram ट्विटरच्या पावलांवर जात आहे. याआधी ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवर NFT संबंधित फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. हे डिजिटल कलेक्शन होल्ड करणार्‍या लोकांना त्यांची ही व्हर्चुअल संपत्ती लोकांना दाखवता येणार आहे. NFTs ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता असून ते लोक, चित्रे, खाद्यपदार्थ, कार्टून आणि गेम कॅरेक्टर्स अशा अनेक गोष्टींपासून प्रेरित असतात.

अमेरिकेतील टेक्सास येथे आयोजित 'साऊथ बाय साउथवेस्ट' परिषदेत बोलताना मार्क झुकेरबर्गने इंस्टाग्रामच्या NFT योजनांबद्दल सांगितले. CoinTelegraph च्या रिपोर्टनुसार, झुकरबर्ग यांनी सांगितले की Instagram वापरकर्ते येत्या काही महिन्यांत अॅपवर त्यांच्या स्वतःच्या NFTs पाहू शकतील. मात्र हे फीचर कधी लाँच होणार याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुकने 1 नोव्हेंबर रोजी कंपनीचे नाव बदलून ते मेटा' असे केले आहे. तसेच मेटा कंपनीचे अधिकारी मेटाव्हर्ससाठी तयार असल्याचा दावा करतात, ज्याला ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) चा सपोर्ट देण्यात आला आहे. ही प्रणाली पूर्णपणे फंगशनल व्हर्च्युअल जग तयार करेल.

झुकेरबर्ग यांच्या दाव्या नुसार मेटाव्हर्सच्या माध्यमातून भविष्यात एखाद्या व्यक्तीचा होलोग्राम तयार करून तो या व्हर्च्युअल जगात सादर करता येईल. जसे ऑफिसमध्ये, मित्रांसोबत, कुटुंबासह. म्हणजेच, दूर राहूनही, एखादी व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांना प्रत्यक्षात भेटल्याचा अनुभव घेऊ शकते. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की, मेटाव्हर्स मार्केट 2024 पर्यंत $800 अब्ज (सुमारे 59,58,719 कोटी रुपये) पर्यंत पोहोचेल.

NFT मेटाव्हर्सचे अंतर्गत घटक बनवेल. हे लोकांना व्हर्च्युअल अवतार म्हणून कनेक्ट आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची परवाणगी देईल. यामुळे आगामी काळात NFT-संबंधित सुविधा WhatsApp आणि Facebook सारख्या प्लॅटफॉर्मवर सुरू होऊ शकतात. इतर सोशल नेटवर्किंग अॅप्स जसे की Reddit, OnlyFans आणि YouTube देखील त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी NFT-केंद्रित फीचर्सच्या चाचण्या घेत आहेत. त्यामुळे हे फीचर आपल्याला लवकरच इतरही ठिकाणी मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT