Nokia PureBook Pro Laptop
Nokia PureBook Pro Laptop 
विज्ञान-तंत्र

Nokia चे दोन पावरफुल लॅपटॉप, मिळेल दमदार प्रोसेसर अन् बरंच काही

सकाळ डिजिटल टीम

Nokia ने आपले दोन नवीन लॅपटॉप Nokia PureBook Pro 17.3 आणि Nokia PureBook Pro 15.6 लॉन्च केले आहेत. नोकियाचा नवीन ब्रँड लायसन्स OFF Global या लॅपटॉप्सचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. नोकियाचे हे लॅपटॉप 8 जीबी रॅम आणि 12th Generation Intel Core i3 CPU ने सुसज्ज आहेत. दरम्यान या लॅपटॉपच्या 17.3-इंच व्हेरिएंटची किंमत 799 युरो (अंदाजे 67,500 रुपये) आणि 15.6-इंच डिस्प्ले आकाराच्या व्हेरिएंटची किंमत 699 युरो (सुमारे 59,100 रुपये) आहे. हे नवीन लॅपटॉप लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लॉन्च केलेल्या दोन्ही लॅपटॉप्समध्ये कंपनी 1920x1080 पिक्सेल रिझोल्युशनसह फुल एचडी IPS डिस्प्ले देत आहे. दोन्ही डिस्प्ले प्रकार 60Hz च्या रीफ्रेश रेट आणि 250 nits च्या पिक ब्राइटनेससह येतात. या लॅपटॉप्समध्ये, कंपनी 8GB DDR4 RAM आणि 512GB M.2 PCIe NVMe SSD ऑफर करत आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये 12th Gen Intel 'Alder Lake' Core i3-1220P देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने या लॅपटॉप्समध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ व्हर्जन 5, दोन यूएसबी टाइप सी 3.2 पोर्ट, यूएसबी टाइप ए 3.3 पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक असे पर्याय दिले आहेत. व्हिडिओ कॉलिंगसाठी, कंपनीकडे 2-मेगापिक्सेल वेबकॅम आणि आवाजासाठी चार 1W स्पीकर आहेत. फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणारे हे लॅपटॉप Windows Hello सपोर्टसह येतात आणि त्यांना Windows 11 आउट-ऑफ-द-बॉक्स ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

लॅपटॉप अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, PureBook Pro 17.3 मध्ये 63Whr आणि PureBook Pro 15.6 मध्ये 57Whr बॅटरी आहे. विशेष बाब म्हणजे हे लॅपटॉप 65W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT