Samsung Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offers: ११ हजारात खरेदी करता येईल ३३ हजारांचा शानदार ५जी फोन, फीचर्स भन्नाट

सॅमसंगच्या १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि ६ जीबी रॅमसह येणाऱ्या फोनला एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरसह खरेदी करण्याची संधी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Samsung Galaxy M53 5G Offer: भारतात ५जी नेटवर्क उपलब्ध झाल्यापासून ५जी स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. तुम्ही देखील नवीन ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगच्या १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ६ जीबी रॅमसह येणाऱ्या फोनवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.

तुम्ही ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवरून Samsung Galaxy M53 5G ला स्वस्तात खरेदी करू शकता. ऑफरनंतर हा फोन फक्त १०,६९९ रुपयात तुमचा होईल. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Samsung Galaxy M53 5G वर मिळेल बंपर ऑफर

ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर Samsung Galaxy M53 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही २० टक्के डिस्काउंटनंतर फक्त २६,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर १३,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. परंतु, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोनची किंमत अजून कमी होईल.

फोन खरेदी करताना बँक ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास Samsung Galaxy M53 5G ला तुम्ही २२,३०० रुपये स्वस्तात खरेदी करू शकता. अशाप्रकारे, ३३ हजार रुपयांच्या फोनला फक्त ११ हजार रुपयात खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M53 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M53 5G मध्ये ६.७ इंच सुपर एमोलेड प्लेस डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. गरज पडल्यास तुम्ही रॅम प्लस फीचरला देखील वाढवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT