oneplus is ready introduce new 55 inch led tv in india check details here
oneplus is ready introduce new 55 inch led tv in india check details here  
विज्ञान-तंत्र

TV खरेदीचा विचार करत असाल तर थांबा! येतोय OnePlusचा 55-इंचाचा LED TV

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, थोडी प्रतीक्षा करा! कारण वनप्लस लवकरच भारतात आपला नवीन टीव्ही लॉन्च करणार आहे. एका टिपस्टरनुसार, OnePlus भारतात एक नवीन 55-इंचाचा LED टीव्ही सादर करण्याची तयारी करत आहे. OnePlus ने भारतासह इतर मार्केटमध्ये आधीच अनेक टीव्ही लॉन्च केले आहेत. कंपनीचे टीव्ही त्यांच्या दमदार पीक्चर क्वालिटी आणि परवडणाऱ्या किमतीमुळे लोकप्रिय आहेत. जुलैमध्ये, कंपनीने 4K स्क्रीन, MEMC आणि ALLM सह 50 Y1S Pro बजेट स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. या नवीन टीव्हीमध्ये काय खास असेल, जाणून घेऊया...

टिपस्टर मुकुल शर्माच्या मते, OnePlus लवकरच भारतात एक नवीन 55-इंचाचा LED टीव्ही लॉन्च करेल. तसेच कंपनी विविध प्रकारच्या स्क्रीन आकारात टेलिव्हिजन देऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. त्याने पुढील टीव्हीच्या फीचर्सबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेले नाही, तरीही आपण अंदाज लावू शकतो की त्यात 4K स्क्रीन, MEMC आणि डॉल्बी ऑडिओ असेल.

टीव्हीची नेमकी लॉन्च तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरच याबद्दल अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, नुकत्याच रिलीज झालेल्या OnePlus TV 50 Y1S Pro च्या फीचर्सवर एक नजर टाकूया.

OnePlus TV 50 Y1S Pro चे फीचर्स

OnePlus TV 50 Y1S Pro मध्ये 50-इंच 4K UHD स्क्रीन दिली आहे. ही HDR10+, HDR10 आणि HLG फॉरमॅटला सपोर्ट करते आणि रिअल टाइम इमेज क्वालिटी सुधारण्यासाठी गामा इंजिनसह येते. टीव्हीमध्ये हाय-एंड, ट्रेंडी बेझल-लेस डिझाइन दिले आहे. यामध्ये 24W कंम्बाइन्ड ऑडिओ आउटपुटसह दोन फुल रेंज स्पीकर, इमर्सिव्ह लिस्निंग एक्सपिरिएंससाठी दोन फुल रेंज स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओ कंपॅबिलीटीचा समावेश आहे.

यामध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, इथरनेट, 3x HDMI 2.1, 2x USB 2.0, ऑप्टिकल आणि ब्लूटूथ 5.0 दिले आहे. टीव्हीची ऑपरेटिंग सिस्टम Android TV 10 आहे. याशिवाय OnePlus चा OxygenPlay 2.0 यूजर इंटरफेस वापरता येईल. 8GB स्टोरेज व्यतिरिक्त, OnePlus TV 2GB RAM सह येतो. यात अलेक्सा, क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टंट सर्व सपोर्ट देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT