Oppo Mobiles esakal
विज्ञान-तंत्र

Oppo Mobiles : Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फोनची किंमत आणि फीचर्स

Oppo ने आज इंडीयन मार्केट मध्ये आपला Oppo Reno 8T 5G फोन लॉन्च केलाय

सकाळ डिजिटल टीम

Oppo Mobiles : Oppo ने आज इंडीयन मार्केट मध्ये आपला Oppo Reno 8T 5G फोन लॉन्च केलाय. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच मायक्रो-कर्व्ड एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाय. शिवाय फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आहे. आणि 8GB रॅम 128GB स्टोरेज देण्यात आलाय.

भारतात या Oppo Reno 8T 5G ची किंमत 29,999 रुपये आहे. मिड रेंजचा हा स्मार्टफोन 10 फेब्रुवारी 2023 पासून Flipkart, Oppo Store आणि इतर रिटेल स्टोअरवर उपलब्ध होईल. या फोनमध्ये सनराइज गोल्ड आणि मिडनाईट ब्लॅक कलरचे ऑप्शन देण्यात आलेत.

विशेष म्हणजे मॅन्युफॅक्चररने या हँडसेटच्या खरेदीवर 3,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देऊ केलीय. याशिवाय कोटक बँक, एचडीएफसी बँक, येस बँक आणि एसबीआयच्या कस्टमर्सना या स्मार्टफोनवर 10 टक्क्यांचा इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो.

Oppo Reno 8T 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Oppo Reno 8T 5G मध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि Dragontrail-Star2 सिक्युरिटी 6.7-इंच मायक्रो- कर्व्ड एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाय.

प्रोसेसर

या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 696 5G चिपसेट देण्यात आलीय.

स्टोरेज

या नव्या स्मार्टफोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. शिवाय मायक्रोएसडी कार्ड (1TB पर्यंत) घालून याचं एक्स्टरनल स्टोरेज वाढवता येऊ शकते. तसेच 8GB पर्यंत एक्सपेंडेबल वर्चुअल रॅम देखील इनकल्युड करण्यात आली आहे.

कॅमेरा

Oppo Reno 8T 5G मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे.

प्रायमरी कॅमेरा 108-मेगापिक्सलचा असून या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरामध्ये 40x मायक्रोलेन्स आणि 2 मेगापिक्सेल झूम कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोन मध्ये 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. सेल्फी एचडीआर, बोकेह फ्लेअर पोर्ट्रेट आणि ड्युअल न्यू व्हिडिओ यासारखे कॅमेरा फीचर्स स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असतील.

सॉफ्टवेअर

नवा Oppo स्मार्टफोन, ऑलवेजऑन डिस्प्ले Android 13 बेस्ड ColorOS 13 फीचर वर चालतो.

बॅटरी

स्मार्टफोन मध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगसाठी 4800mAh बॅटरी देण्यात आलीय. ही बॅटरी 45 मिनिटांत 100 टक्के चार्ज होण्याचा दावा कंपनीने केलाय.

कनेक्टिव्हिटी

कनेक्टिव्हिटी ऑप्शन्सच बघायला गेलं तर Oppo Reno 8T 5G मध्ये WiFi 5, Bluetooth 5.1, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस रिकग्निशन टेक्निक देण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT