Paytm electricity bill
Paytm electricity bill ndj97
विज्ञान-तंत्र

Paytm ची फर्स्ट क्लास ऑफर! बिल भरताच खात्यात जमा होणार पैसे

सकाळ डिजिटल टीम

वीजबिल भरणे हा महिन्यातला सर्वात कंटाळवाणा विषय आहे. अनेकदा अति वीज बिलामुळेही चिडचिड होते. पण आता पेटीएम ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. Paytm ने नुकतीच Bijlee Days ची घोषणा केली आहे.

या दिवसांमध्ये जर तुम्ही Paytm वरुन तुमचं विजेचं बिल भरलं तर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या ऑफर अंतर्गत विज बिल भरणाऱ्यांना १०० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे सोबतच त्यांना आणि अॅडिशनल रिवॉर्ड्सचा सुद्धा लाभ घेता येणार. पण विशेष म्हणजे युजरला दरमहा 10 ते 15 तारखेच्या आत वीज बिल भरावं लागणार.

Paytm वर 100 टक्के कॅशबॅक आणि 2 हजार रुपयांपर्यंतचा फायदा फक्त 50 यूझर्सला मिळणार आहे. जे लोक फक्त पेटीएमच्या माध्यमातून विजेचं बिल भरतील त्यांनाच याचा फायदा घेता येणार.

याशिवाय जे लोक पहिल्यांदाच पेटीएमवर वीजबिल भरणार त्या युझर्ससाठी पेटीएम ने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर द्वारे यूजर्सला 200 रुपयांपर्यंत कॅशबॅकची सुविधा मिळणार आहे. यासाठी त्यांना एक विशेष प्रोमो कोडचा वापर करावा लागणार. 'ELECNEW200' या ऑफर कोडचा वापर करुन तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

पेटीएमवर बिल कसं भरायचं ?

  • सुरवातीला Paytm च्या वेबपेजवर जा.

  • Recharges and Bill Payments ऑप्शनवर क्लिक करा.

  • यातील Electricity बिल पर्यायावर क्लिक करा.

  • इलेक्ट्रिसिटी बोर्डवर क्लिक करावं.

  • पुढे कस्टमर आयडेन्टिफिकेशन नंबर टाका.

  • Proceed ऑप्शनवर क्लिक करा.

  • बिलाची रक्कम भरण्यासाठी पेमेंट ऑप्शन तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडा आणि Proceed With tha payment ऑप्शनवर क्लिक करा. 

  • पेमेंट करण्यासाठी तुम्ही Paytm UPI, Paytm Waller, क्रेडिट कार्ड, डेबिट र्काड आणि नेटबँकिंगचा सुद्धा वापर करू शकता.

  • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तसंच पेमेंटची पावती देखील दिसेल ती डाऊनलोड करुन घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT