Realme 10 4G Sakal
विज्ञान-तंत्र

Realme: 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह आला भन्नाट स्मार्टफोन, किंमत खूपच कमी

Realme 10 4G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनची सुरुवाती किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Realme 10 4G Launched: रियलमीने भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Realme 10 4G ला लाँच केले आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G99 प्रोसेसर सारखे फीचर्स मिळतील. Realme 10 4G स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Realme 10 4G ची किंमत

Realme 10 4G च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी १६,९९९ रुपये खर्च करावे लागतील. लाँच ऑफर अंतर्गत ४ जीबी रॅम व्हेरिएंटला १ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

फोनची १५ जानेवारीपासून realme.com, फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोरवरून विक्री सुरू होईल. रियलमीचा हा फोन व्हाइट आणि रश ब्लॅक रंगात येतो.

हेही वाचा: keyboard shortcuts: लॅपटॉपवर सहज काढता येईल स्क्रीनशॉट, जाणून घ्या या कामाच्या Shortcut Keys

Realme 10 चे स्पेसिफिकेशन्स

Realme 10 मध्ये ६.४ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा आस्पेक्ट रेशियो २०:९, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोन अँड्राइड १२ वर आधारित Realme UI ३.० वर काम करतो. यात ऑलवेज-ऑन डिस्प्ले (AOD) देण्यात आला आहे.

Realme 10 4G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो G99 प्रोसेसरसह ४ जीबी/८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. तर पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. यात सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळेल.

यात फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ड्यूल 4G VoLTE, वाय-फाय ८०२.११एसी, ब्लूटूथ ५.१, NFC सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT