Sameer app road damage reporting app esakal
विज्ञान-तंत्र

Road Damage : तुटलेला, खराब रस्ता अन् खड्ड्यांची करता येणार तक्रार, लगेच होणार दुरुस्ती, फोनमध्ये इंस्टॉल करा 'हे' सरकारी अ‍ॅप

Sameer app for reporting road damage : समीर अ‍ॅपच्या मदतीने आता खड्ड्यांची तक्रार सहज करता येते. सरकारी अ‍ॅपमधून तुटलेले रस्ते नोंदवून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करता येते.

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • आता अ‍ॅपद्वारे नागरिक रस्त्यावरच्या खड्ड्यांची तक्रार सहज नोंदवू शकतात.

  • फोटो, लोकेशन आणि माहिती देऊन तक्रार प्रक्रिया पार पडते.

  • अ‍ॅप सर्व मोबाइल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Sameer App : हल्ली रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना एक प्रश्न पडतो, रस्त्यात खड्डे आहेत की मग खड्ड्यात रस्ते. हा विचार करताच आपण लोकप्रतिनिधी आणि शासनाला वाईट-साईट बोलू लागतो. पण आता या सगळ्यांवर एकदम भारी उपाय शासनानेच उपलंदह करून दिला आहे. तिथ तुम्ही तुमच्या परिसरातील खराब रस्ते आणि खड्डे नोंदवू शकता असे सांगण्यात आले आहे.त्यानंतर ते दुरुस्त केले जातील. चला तर मग जाणून घेऊया या अ‍ॅपबद्दल सविस्तर माहिती.

या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात फक्त पाणी साचत नाही तर ते मोठ्या प्रमाणात अपघातांचे कारण देखील बनतात.खराब रस्ते आणि खड्डे दुरुस्त करण्यासाठी तुम्ही या सरकारी अॅपची मदत घेऊ शकता. या अॅपचे नाव समीर अॅप आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे अॅप विकसित केले असून आणि याचा वापर AQI इत्यादींसाठी होणार आहे. तुम्ही या अॅपवर रस्तेच नाहीत, तुटलेले रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे यांच्याबद्दल तक्रार नोंदवू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल तक्रार कुठे करायची?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वतः त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्वीटर) अकाउंटवरून या अ‍ॅपबद्दल माहिती पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या अ‍ॅपबद्दल माहिती देताना म्हटले आहे की जर तुम्हाला तुमच्या जवळ कुठेही तुटलेला, खराब रस्ता किंवा खड्डे दिसले तर #SameerApp डाउनलोड करा आणि 'कच्चा रस्ता/खड्डे' या श्रेणीमध्ये तक्रार दाखल करा.

समीरअ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता. ज्याची माहिती पोस्टमध्ये दिली आहे.

रस्त्यावर खड्ड्याबद्दल तक्रार कशी करावी?

  • समीर अ‍ॅपवर तक्रार नोंदवणे खूप सोपे आहे. यासाठी वापरकर्त्यांना अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल.

  • यानंतर वापरकर्त्यांना Add Complaints वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर श्रेणी निवडावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला एक फोटो अपलोड करण्याचा पर्याय मिळेल, तिथे फोटो अपलोड करा. यानंतर तक्रारीचे थोडक्यात वर्णन दिले जाईल.

  • अ‍ॅपमध्ये लोकेशन देण्याचा पर्याय देखील आहे, ज्यासाठी तुम्ही Use My Current Location या पर्यायावर क्लिक करू शकता. येथे पब्लिक लॉगिनचा पर्याय देखील आहे. ते तुम्हाला AQI बद्दल माहिती देते.

आता नक्कीच या अ‍ॅपबद्दल चांगली माहिती संबंधित विभागाने दिली आहे पण खरोखर यावर नोंदवलेल्या तक्रारीवर प्रक्रिया होते का, रस्ते दुरुस्त होतात का? की हे फक्त एकतर्फी राहील हे पाहण्यासारखे असेल

FAQs

1. How to download the Sameer App?

समीर अ‍ॅप कसे डाऊनलोड करावे?
➤ समीर अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.

2. What details are needed to file a complaint?

तक्रार नोंदवण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे?
➤ फोटो, स्थान, श्रेणी निवड, व तक्रारीचे थोडक्यात वर्णन द्यावे लागते.

3. Can I upload an image of the road condition?

मी रस्त्याच्या परिस्थितीचा फोटो अपलोड करू शकतो का?
➤ होय, अचूक माहिती देण्यासाठी फोटो अपलोड करणे उपयुक्त आहे.

4. Is GPS location required while submitting a complaint?

तक्रार करताना GPS लोकेशन आवश्यक आहे का?
➤ होय, स्थानिक यंत्रणेला अचूक माहिती मिळण्यासाठी GPS आवश्यक असते.

5. Is the Sameer app available for iOS users?

समीर अ‍ॅप आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे का?
➤ होय, हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislature Clash: नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला पोलीस कोठडी; पण किती दिवसांची? विधिमंडळातील प्रवेशाबाबतही मोठा निर्णय

Vidhan Bhavan Clash: महाराष्ट्राचा युपी बिहार झाला का? विधान भवनातील राडा प्रकरणी मनसेचे नेत्याचा सवाल

Hijack Code Used by Pilots: विमान 'हायजॅक' झाल्याचं पायलट ‘ATC’ला नेमकं कोणत्या कोडद्वारे कळवतो?

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसतात? पायलट लोकांचा असतो विरोध

Latest Marathi News Updates : उधारीवर घेतलेल्या सोन्याची रक्कम न देता सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT