Royal Enfield Bikes Price Hike in india
Royal Enfield Bikes Price Hike in india 
विज्ञान-तंत्र

अनेकांच स्वप्न महागलं! रॉयल एनफिल्डने वाढवल्या 'या' बाइक्सच्या किमती

सकाळ डिजिटल टीम

Royal Enfield Bikes Price Hike : दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) भारतात आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने Classic 350, Meteor 350 आणि Himalayan Motorcycles च्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन दर हे जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे. रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल Classic 350 ची सर्वात कमी आणि हिमालयीन रेंज बाइक्सच्या किंमतीत सर्वाधिक 4000 रुपयांची वाढ झाली आहे.

Meteor 350 Fireball ची नवीन किंमत

Royal Enfield Meteor 350 Fireball रेंजच्या किमती 2511 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. या बाइकची किंमत आता 2.01 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 2.03 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. Meteor 350 लाइनअपमधील बाइक्सच्या स्टेलर रेंजच्या सर्व व्हेरिएंटच्या किंमतीत 2601 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. Meteor 350 च्या स्टेलर रेंजची किंमत आता 2.07 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 2.09 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Meteor 350 लाइनअप मधील टॉप-स्पेक मॉडेल, सुपरनोव्हाला (Supernova ) च्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. 2752 रुपयांच्या वाढीनंतर, या रेंजची किंमत आता 2.17 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 2.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Classic 350 ची नवीन किंमत

क्लासिक 350 रेंजमधील बाइकची किंमत व्हेरिएंटनुसार 2872 ते 3332 रुपयांपर्यंत वाढली आहे. एंट्री-लेव्हल Redditch Classic 350 350 ची किंमत आता 1.87 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल, तर टॉप-स्पेस क्रोम क्लासिक 350 ची किंमत 2.18 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल.

Royal Enfield Himalayan ची नवीन किंमत

रॉयल एनफिल्ड हिमालयन रेंजमधील सर्व बाइक्सच्या किमती 4,000 रुपयांपेक्षा जास्तीने वाढल्या आहेत. सिल्व्हर आणि ग्रे हिमालयनची किंमत आता 2.14 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होईल, तर ब्लॅक आणि ग्रीन हिमालयनची किंमत वाढून 2.22 लाख (एक्स-शोरूम) असेल.

या मॉडेल्सच्या किमती जैसे थे

याशिवाय Royal Enfield चे आणखी तीन मॉडेल्स देखील आहेत, ज्यात Interceptor, Continental GT आणि Bullet यांचा समावेश आहे. मात्र, या मोटरसायकलींच्या किमतीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Thackeray: 'नकली संतान' उद्धव ठाकरेंवरून मोदींचा यूटर्न, नेमकं काय म्हणाले होते? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : खडकवासला परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस

Share Market Closing: शेअर बाजाराने घेतला सुटकेचा निश्वास; 5 दिवसांनंतर निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

सोलापुरात आज शून्य सावली दिवस; वर्षात दोनवेळाच अशी स्थिती; खगोलप्रेमींना निरीक्षणाची संधी

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

SCROLL FOR NEXT