Bike Technology ESAKAL
विज्ञान-तंत्र

Royal Enfield चं लेटेस्ट बाईक मॉडेल आहे सगळ्यात भारी; जाणून घ्या फिचर अन् किंमत

7 महिन्यांपूर्वी रॉयल एनफिल्डने भारतात आपली Scram 411 मोटारबाईक लॉन्च केली

सकाळ डिजिटल टीम

Bike Technology : 7 महिन्यांपूर्वी रॉयल एनफिल्डने भारतात आपली Scram 411 मोटारबाईक लॉन्च केलीय. या बाईकमध्ये सर्वात खास काही असेल तर या बाईकची स्पर्धा रॉयल एनफिल्डच्याच हिमालयीन बाईकशी आहे.

पण या सेगमेंटमधली भारी बाईक कोणती असा प्रश्न तुम्हाला आपसूकच पडेल, कारण या दोन्ही बाईक एकाच ब्रँडच्या आहेत. तर काळजी करू नका, लेख सविस्तर वाचा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्या.

पहिला फरक - विंड स्क्रीन

तुम्हाला रॉयल एनफिल्डच्या हिमालयीन बाईकच्या फ्रंट साईडला विंडस्क्रीन मिळेल, पण Scram 411 मध्ये हा ऑप्शन नाहीये. त्यात स्क्रॅम्बलर सारखा काऊल मिळतो. या काऊलमुळे Scram 411 हिमालयनपेक्षा स्वस्त ठरते. पण जर तुम्हाला लाँग राइड्स आवडत असतील.

म्हणजे जर तुम्ही 300 ते 400 किलोमीटर असा प्रवास बाईकवरून करणार असाल तर Scram 411 मध्ये विंड ब्लास्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लॉंग राईडसाठी हिमालयन बेस्ट ऑप्शन काहे. विंड ब्लास्ट म्हणजे काय तर राईड दरम्यान तुमच्या चेहऱ्यावर जी हवा आढळते त्याने तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटू शकतं.

दुसरा फरक- साईड पॅनेल

हिमालयनच्या साईडला तुम्हाला लोखंडी ग्रील दिलेली असते. यात तुम्ही एखादा कंटेनर कॅरी करू शकता. पण यात तुम्हाला श्राउड्स मिळतील ज्यावर रॉयल एनफील्डचा बॅज असेल. हा बॅज दिसायला खूपच आकर्षक असतो.

तिसरा फरक - सीट

तिसरा फरक तुम्हाला सीटमध्ये दिसेल. स्क्रॅम 411 मध्ये सिंगल सीट दिलेली आहे. तर हिमालयन मध्ये स्प्लिट सीट आहे.

चौथा फरक - कलर ऑप्शन

हिमालयनच्या तुलनेत Scram 411 मध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन्स मिळतात. यात तुम्हाला 7 कलर ऑप्शन्स मिळतात. 3 सिंगल टोन आणि 4 ड्युअल टोन कलर आहेत.

पाचवा फरक - फ्रंट टायर

Scram 411 चा पुढचा टायर हिमालयनपेक्षा रुंद आहे. स्क्रॅम 411 ला 100/90 सेक्शनचा फ्रंट टायर मिळतो. तर हिमालयनला 90/90 सेक्शनचा फ्रंट टायर मिळतो.

सहावा फरक - हँडलबार

सहाव्या फरकाबद्दल बोलायचं झालं तर, बाइकचा स्टान्स हा अॅडव्हेंचर टूररसारखाच आहे. दोन्ही बाईकला रुंद हँडल आहेत. पण Scram 411 चं हँडल हिमालयाच्या तुलनेत थोडं खाली कमी आहे, ज्यामुळे हॅन्डलिंग एकदम बेटर राहतं.

सातवा फरक- सीटची हाईट

Scram 411 ची सीट हिमालयाच्या तुलनेत थोडी खाली आहे. त्याच्या सीटची उंची 795 मिलीमीटर आहे. तर हिमालयनमध्ये 780 मिलिमीटर हाईट आहे.

आठवा फरक - इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

Scram 411 चा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हिमालयाच्या तुलनेत अगदी सिम्पल आहे. तुम्हाला Scram च्या तुलनेत हिमालयन मध्ये जास्त डिटेलिंग मिळेल.

नववा फरक - स्वीचेबल ABS

हिमालयनमध्ये स्विचेबल ABS फिचर मिळतं. पण Scram 411 मध्ये हा ऑप्शन मिळत नाही.

दहावा फरक - ग्राउंड क्लीयरन्स

हिमालयनचा ग्राऊंड क्लीयरन्स 220 मिमी आहे. तेच, Scram 411 मध्ये 200 mm चा ग्राउंड क्लीयरन्स आहे. म्हणजेच, दोघांमध्ये 20 मिमीचा फरक आहे.

किंमत

Scram 411 ची दिल्ली एक्स-शोरूमची स्टारटिंग रेंज 2.03 लाख रुपये आहे. पुढे ती वाढून 2.11 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याचवेळी, हिमालयनची स्टारटिंग रेंज 2.15 लाख रुपये आहे. ती वाढून 2.22 लाख रुपयांपर्यंत जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT