WhatsApp fraud, WhatsApp Scam in Marathi
WhatsApp fraud, WhatsApp Scam in Marathi Sakal
विज्ञान-तंत्र

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनो सावधान! 'हे' कराल तर बँक खातं होईल रिकामं; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Fraud Alert: व्हॉट्सअ‍ॅपवर सतत नवनवीन फिचर्स येत असतात. काही दिवसांपूर्वी आलेले पेमेंट फिचरही खूप उपयुक्त आहे. वापरकर्त्यांना फक्त एक QR कोड स्कॅन करावा लागेल, रक्कम प्रविष्ट करावी लागेल आणि पैसे हस्तांतरित केले जातील. मात्र, ही प्रक्रिया सुलभ झाल्याने आता फसवणूक करणाऱ्यांचे लक्षही त्यावर लागले आहेत. काही स्कॅमर गुन्हे करण्यासाठी QR कोड प्रणाली वापरत आहेत आणि ते तुम्हाला फसवू शकतात. (Some scammers are defrauding people through the WhatsApp Pay QR code system)

WhatsApp QR कोड घोटाळा काय आहे?

QR कोड ही ऑनलाइन पेमेंटची सोपी पद्धत समजली जाते. मात्र यातून फसवणूक करणारेही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. तुम्ही एखादी वस्तू विकल्यास, फसवणूक करणारे तुमचे उत्पादन खरेदी करण्याचे नाटक करतात. यानंतर ते तुमच्यासोबत व्हॉट्सअॅपवर क्यूआर कोड शेअर करतात. (WhatsApp Scam in Marathi)

ते तुम्हाला ते Google Pay किंवा इतर कोणत्याही UPI-आधारित ऍप्लिकेशनद्वारे स्कॅन करण्यास सांगतात जेणेकरून पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करता येतील. फसवणूक करणाऱ्याची आज्ञा पाळल्याने तुम्हाला पैसे मिळण्याऐवजी बँक खाते रिकामे होते. वास्तविक, तुम्ही कोड स्कॅन करताच, तो तुम्हाला MPIN मागेल आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?

1. ज्यांना ऑनलाइन पेमेंटचे फारसे ज्ञान नाही, त्यांनी त्याबद्दल माहिती घेणे किंवा रोखीने व्यवहार करणे केव्हाही चांगले.

2. जेव्हा तुम्हाला एखाद्याला पेमेंट करण्याची आवश्यकता असेल, तेव्हा तुम्ही नेहमी WhatsApp वर QR कोड स्कॅन केल्यानंतर नाव किंवा UPI आयडी दोनदा तपासा आणि नंतर पेमेंट करा.

3. नेहमी लक्षात ठेवा की पैसे अकाउंटवर येण्यासाठी MPIN कधीही प्रविष्ट करावा लागत नाही. जेव्हा तुमच्या बाजूने पैसे म्हणजेच तुम्ही पैसे पाठवणार असाल तेव्हाच तो प्रविष्ट करावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT