spam calls on phones to end soon govt working on its own truecaller like mechanism report rak94 
विज्ञान-तंत्र

स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका! जाणून घ्या सरकारचा नवीन प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एका नवीन मॉडेलवर काम करत आहे जे मूलत: वापरकर्त्यांच्या फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव फ्लॅश करेल. आत्ता फोनच्या स्क्रीनवर तो नंबर जर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असेल तरच नाव दिसतं. एका उच्च अधिकार्‍याचा हवाला देत पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ट्राय लवकरच फोन स्क्रीनवर कॉलरचे केवायसी-आधारित नाव फ्लॅश करण्यासाठी एक यंत्रणा तयार करत आहे.

सध्या Truecaller सारखे अॅप्स आहेत जे वापरकर्त्यांना नंबर सेव्ह नसताना देखील फोन करणारी व्यक्ती कोण आहे ते ओळखण्यास मदत करतात. मात्र, अॅपवरील बहुतेक डेटा क्राउडसोर्स केलेला असल्यामुळे त्याला मर्यादा आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ट्रायला चर्चा सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून (DoT) एक संदर्भ (reference) पाठवण्यात आवा आहे . ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला म्हणाले की, काही महिन्यांत यावर चर्चा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आम्हाला नुकताच एक संदर्भ देण्यात आला आहे आणि आम्ही लवकरच त्यावर काम सुरू करू असे देखील त्यांनी सांगितले.

कोणीतरी कॉल केल्यावर KYC नुसार त्या व्यक्तीचे नाव दिसेल. वाघेला म्हणाले की, या यंत्रणेमुळे दूरसंचार कंपन्यांनी केलेल्या केवायसीनुसार फोन स्क्रीनवर नाव दिसणे शक्य होईल.

स्पॅम कॉल्सचा सामना करण्यासाठी सरकार आणि स्मार्टफोन OEM चे प्रयत्न सुरू असून, हे पाऊल संपूर्ण कॉलिंग नेटवर्कमध्ये पारदर्शकता आणू शकते. या टप्प्यावर ही हालचाल फक्त एक संदर्भ असल्याने, याची आमंलबजावणी कधीपर्यंत केली जाईल ते अद्याप अस्पष्ट आहे आणि पूर्णपणे पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Latest Marathi News Updates : लाडक्या बहिण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT