Sridhar Vembu, the visionary founder of Zoho Corporation, transformed a small startup into a global SaaS powerhouse through innovation, simplicity, and rural empowerment.

 

esakal

विज्ञान-तंत्र

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Zoho Company Journey : ...तर अदाणी अन् अंबानींच्या कंपन्यांनाही 'झोहो' लवकरच मागे टाकेल; वाचा श्रीधर वेम्बूंची यश कथा.

Mayur Ratnaparkhe

Sridhar Vembu Success Story : सध्या सर्वत्र चर्चेत असणारं जोहो हे नाव तुम्हीही ऐकलं असेल किंवा तुमच्याही वाचण्यात आलं असेल. ही एक स्वदेशी कंपनी आहे, तिला एका भारतीयानेच बनवलं आहे. मात्र आज ही कंपनी अनेक देशांमध्ये व्यवसाय करत आहे. मात्र ही कंपनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामुळे अचानक चर्चेत आली आहे.

अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत एक प्रेझेंटेशन दिले होते आणि ते त्यांनी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट किंवा गुगलवर तयार केले नव्हते. तर त्याऐवजी, त्यांनी झोहोच्या Zoho Show मध्ये त्यांचे प्रेझेंटेशन तयार केले होते. त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत याबद्दल चर्चा केली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लाखो भारतीयांना झोहोची ओळख झाली. तुम्हीही कदाचित यापूर्वी क्वचितच याबद्दल ऐकले असेल, परंतु आता हे नाव जवळपास प्रत्येकाच्या ओठांवर दिसत आहे. जर या कंपनी आणखी एक पाऊल पुढे टाकले तर ती कदाचित अदाणी ग्रुप आणि अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला टक्कर देऊ शकते, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू हे आहेत. त्यांचे सध्याचे वय ५७ वर्ष आहे, परंतु त्यांनी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी या कंपनीची स्थापन केली होती. आज कंपनीचे मूल्यांकन १२.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा भारतीय रुपयांमध्ये १.०३ लाख कोटी आहे. विशेष बाब म्हणजे, ही कंपनी अद्याप शेअर बाजारात सूचीबद्ध नाही आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, श्रीधर वेम्बू यांना ही कंपनी उभारण्यासाठी कुणाकडूनही एक रुपयाचा देखील निधी मिळालेला नाही. याचा अर्थ त्यांची कंपनी,  झोहो  बुटस्ट्रॅप आहे. बूटस्ट्रॅप्ड म्हणजे स्वतःच्या बचतीचा आणि वैयक्तिक संसाधनांचा वापर करून तसेच कोणत्याही बाहेरील गुंतवणूकदाराकडून पैसे न घेता उभारलेली कंपनी होय.

झोहो कंपनीबाबत ही प्राथमिक माहिती जाणून घेतल्यानंतर आता या कंपनीची सुरुवात नेमकी कशी झाली आणि कशाप्रकारे ही कंपनी अदाणी आणि अंबानींच्या कंपन्यांनाही टक्कर देऊ शकते, याचबरोबर झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांच्याबाबतही आपण जाणून घेऊया.

श्रीधर वेम्बू यांची सुरुवात कशी झाली? -

तामिळनाडूच्या तंजावुर जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या श्रीधर वेम्बू यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक आणि युनायटेड स्टेट्समधील प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी मिळवली. १९९४ मध्ये, त्यांनी क्वालकॉममध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र काही वर्षांनी त्यांनी अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. ते भारतात परतले, पण दिल्ली, बंगळुरू किंवा हैदराबादला गेले नाहीत. तर त्याऐवजी  ते त्यांच्या मूळ गावी तामिळनाडूत परतले आणि येथूनच  एक नवीन कहाणी सुरू झाली. या कहानीत त्यांच्या कुटुंबातील इतर अनेक सदस्यांचाही समावेश होते.

श्रीधर वेम्बूंनी सुरू केला स्वत:चा व्यवसाय -

श्रीधर वेम्बू यांनी त्यांचे मित्र आणि कुटुंबासह मिळून अॅडव्हेंटनेट नावाची कंपनी सुरू केली. तिचे काम भारतीय सॉफ्टवेअर विकसित करणे होते. नंतर,  हीच अॅडव्हेंटनेट कंपनीचे झोहोत रूपांतर झाले. आज झोहोकडे ५० हून अधिक प्रॉडक्ट आहेत. ते थेट मायक्रोसॉफ्ट आणि गुगलशी स्पर्धा करतात, अगदी व्हॉट्सअॅपलाही आव्हान देत आहेत. त्यांचे प्रॉडक्ट जगभरातील तब्बल १८० हून अधिक देशांमध्ये वापरले जात आहेत.

कंपनीला शून्यातून जागतिक पातळीपर्यंत पोहचवणारे श्रीधर वेम्बू सध्या कंपनीचे सीईओ नाहीत. तर ते या कंपनीचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. झोहोचे सध्याचे सीईओ शैलेश कुमार डेव्ही आहेत. कंपनीचे संस्थापक, श्रीधर वेम्बू यांनी नेहमीच झोहोमध्ये कोणत्याही प्रकारच्या फंडींगला विरोध केला आहे. त्यांनी कंपनी पूर्णपणे स्वतःच्या बचतीतून आणि नफ्यातून उभारली आहे. १९ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या २०२४ च्या बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० अहवालानुसार, बूटस्ट्रॅप फर्म झोहो कॉर्पोरेशन एक अनलिस्टेड कंपनी म्हणून उदयास आली होती.

अदानी आणि रिलायन्सच्या तुलनेत जोहो सध्या कुठे? -

सध्याच्या प्राप्त माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​बाजार भांडवल १८,५०,७०० कोटी आहे. तर, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे २,८९,४६८ कोटी आहे. याशिवाय झोहोचे सध्याचे मूल्यांकन १.०३ लाख कोटी आहे, जे अदानी ग्रुपपेक्षा फारसे कमी नाही. सध्या, झोहो शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाही आणि विशेष म्हणजे कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांना त्यांची कंपनी सध्या लिस्ट करण्याचीही इच्छा देखील नाही. मात्र, जर कधी ही कंपनी लिस्ट झाली तर तिचे मूल्यांकन अदानी एंटरप्रायझेसपेक्षा जास्त असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT