Suzuki Burgman Street
Suzuki Burgman Street esakal
विज्ञान-तंत्र

Suzuki Burgman Street स्कूटर खरेदी करा १० हजारात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशाच्या टु व्हिलर सेक्टरमध्ये बाईकप्रमाणेच स्कूटरचीही एक मोठी रेंज आहे. ज्यात अधिक मायलेज देणारे बजेट स्कूटरपासून हायटेक फिचर्स प्रीमियम स्कूटर आहेत. त्यात आज आपण बोलणार आहोत सुझुकी बर्गमन स्ट्रीटच्या (Suzuki Burgman Street) ब्लुटूथ व्हेरिएंटविषयी. जे कंपनीचे एक प्रीमियम आणि लोकप्रिय स्कूटर आहे. तुम्ही सुझुकी बर्गमन स्ट्रीट जर खरेदी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ८६ हजार १०० रुपयांपासून ते ८९ हजार ६०० रुपयांपर्यंत खर्च येईल. मात्र तुम्ही डाऊन पेमेंट प्लॅनवर ही स्कूटर केवळ १० हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. टु व्हिलर सेक्टरची माहिती देणारी वेबसाईट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार जर तुम्ही या स्कूटरचे ब्लूटुथ व्हेरिएंट खरेदी करता, तर त्यासाठी कंपनीशी संलग्न बँक या स्कूटरवर ९२ हजार ८०२ रुपये लोन देईल. (suzuki burgman street buletooth variant buy With down payment ten thousand)

या स्कूटरवर मिळणाऱ्या कर्जावर तुम्हाला १० हजार ३११ रुपये डाऊन पेमेंट द्यावे लागेल आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला ३ हजार ३३९ रुपये महिन्याला ईएमआय भरावे लागेल. सुझुकी बर्गमन स्ट्रीटवर मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी बँकेच्या वतीने ३६ महिने ठेवण्यात आले आहे. या स्कूटरवर मिळणाऱ्या कर्जावर बँक ९.७ टक्के वार्षिक दराने व्याज घेईल. जर तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल, तर डाऊन पेमेंट प्लॅननंतर जाणून घ्या तिचे फिचर्स...

सुझुकी बर्गमन स्ट्रीटमध्ये कंपनीने दिले आहे १२४ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन. जे फ्युल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.७ पीएसचे पाॅवर आणि १० एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याच्या बरोबर ट्रान्समिशन ऑटोमॅटिक दिले गेले आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टिमवर बोलाल तर कंपनीने तिच्या फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेक काॅम्बिनेशन दिले आहे. स्कूटरच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे, की ती ५५.८९ किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देईल.

(टीप : स्कूटरवर मिळणारे कर्ज, डाऊन पेमेंट आणि व्याज दर तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोरवर आधारित असेल. त्यात निगेटिव्ह रिपोर्ट आल्यावर बँक या तीन गोष्टींबाबत आपल्या प्रमाणानुसार बदल करु शकते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT