Tech Tips  esakal
विज्ञान-तंत्र

Tech Tips : आता सुरू केला नाही तोवर संपला इंटरनेट डेटा, मोबाईलमधील हे सेटींग चेक करा

फोनमध्ये हाय स्पीड इंटरनेटमुळे डेटाचा वापर देखील वेगाने वाढेल

Pooja Karande-Kadam

Tech Tips :

कधी कधी दिवस सुरू व्हायच्या आधीच आपला नेट पॅक संपलेला असतो. पहाटे कधीतरी आपण थोडावेळ मोबाईल पाहीलेला असतो. त्याचा परिणाम असा होतो की दिवस संपायच्या आधीच मोबाईलमधील डेटा संपतो.  

तुम्ही सुद्धा 5G फोन वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. खरेतर, इंटरनेटचे सर्वात वेगवान तंत्रज्ञान असलेल्या 5G चे सेटिंग्ज बदलले नाहीत, तर इंटरनेट लवकर संपेल. 

फोनमध्ये हाय स्पीड इंटरनेटमुळे डेटाचा वापर देखील वेगाने वाढेल. म्हणजेच, पूर्वी जिथे तुम्ही 4G सेटींगवर डेटा दिवसभर वापरत होता. त्याच स्पीडमुळे डेटा लवकर संपत आहे. जर तुम्ही गरजेनुसार डेटा सेटिंग्ज बदलल्यास डेटाबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

डेटा वाचवण्यासाठी या सेटिंग्ज चेक करा

5G तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, स्मार्टफोन वापरकर्त्यांना 4G, 3G/2G टेक्नोलॉजीचा ऑप्शन मिळतो. जिथे तुम्हाला डेटा सेव्ह करण्याची गरज भासते, तिथे तुम्ही डेटा सेटिंग 4G, 3G/2G टेक्नॉलॉजी सेट करू शकता.

तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.

  • आता तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये यावे लागेल. मोबाईल नेटवर्क पर्याय.

  • आता सिम पण तुम्ही नेट वापरत असाल तर तुम्हाला त्यावर टॅप करावे लागेल.

  • आता तुम्हाला Preferred network type वर टॅप करावे लागेल.

  • आता तुम्हाला 5G/4G/3G/2G सेटिंग बदलावी लागेल.

  • तुम्ही 4G/3G/2G सेटिंग बदला

  • तुम्ही 3G/2G आणि 2G ओन्ली या  पर्यायावर टॅप करू शकता.

का संपतो डेटा

5G तंत्रज्ञानाने, सोशल मीडिया पाहतानाच नेटचा वापर वेगाने होतो. सोशल प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर रील्स-शॉर्ट्स पाहताना जास्त डेटा खर्च होतो. रिल्स बघताना किती डेटा खर्च होतो याकडे लक्ष नसतं त्यामुळे तेव्हा जास्त डेटा खर्च होतो. (Technology News)

खूपच कामाचे आहे हे फीचर

अँड्राइड स्मार्टफोनमध्ये Data Saver Mode फीचर उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही डेटाचा वापर कमी करू शकता. तुम्हाला सेटिंग्समध्ये एक छोटासा बदल करावा लागेल, ज्यामुळे डेटाचा जास्त वापर होणार नाही व तुमचा खर्चही वाचेल.

सर्वात प्रथम तुम्हाला अँड्राइड फोनच्या सेटिंग्समध्ये जा

येथे तुम्हाला SIM Card & Mobile Data चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा

आता Data Usage या पर्यायावर जा.

येथे तुम्हाला Data Saving चा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

त्यानंतर डेटा सेव्हिंग मोड ऑन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT