Technology Tips
Technology Tips esakal
विज्ञान-तंत्र

Technology Tips : आता फेसबुक-इन्स्टाग्रामवर अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी भरावे लागणार पैसे

सकाळ डिजिटल टीम

Technology Tips : इलॉन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिकसाठी पैसे चार्ज करायला सुरुवात केली होती. आता तसाच चार्ज सोशल मीडिया कंपनी मेटाने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ब्लू टिक्ससाठी आकारायला सुरुवात केली आहे.

Meta ने नुकतेच यूएस मधील Blue Tick सह मेटा अकाऊंट म्हणजेच Facebook आणि Instagram अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी प्रति महिना 14.99 डॉलर चार्ज लावायला सुरुवात केली आहे. थोडक्यात दरमहा 1,450 रुपये आणि वेब ब्राउझरद्वारे मेंबरशीप घेण्यातही प्रति महिना 1,009 रुपये द्यावे लागतील.

Twitter ब्लू सबस्क्रिप्शन प्रमाणेच, Meta Verified तुमच्या Instagram आणि Facebook खात्यांवर ब्लू चेकमार्क देईल. सध्या मेटा व्हेरिफाईड बीटा व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे आणि युजर्सना त्यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट व्हेरीफाय करण्यासाठी वेटींग लिस्ट मध्ये थांबावं लागेल.

प्रोफाइलवर ब्लू टिक व्यतिरिक्त, मेटा व्हेरिफाय केलेल्या अकाऊंटला काही सुविधा देईल. यामध्ये प्रोएक्टिव प्रोटेक्शन, डायरेक्ट कस्टमर सपोर्ट, जास्तीचा रीच आणि एक्सलूसिव एक्सट्रा यांचा समावेश आहे. पण व्हेरीफिकेशनचा ऑप्शन 18 वर्षाखालील व्यक्तींसाठी उपलब्ध नाही.

व्हेरिफिकेशनसाठी कोण अर्ज करू शकतो?

किमान 18 वर्षे वय असलेला कोणताही फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर त्याचं अकाऊंट व्हेरिफाय करू शकतो. पब्लिक किंवा परयचेत प्रोफाईल असलेले युजर्स ज्यांची अॅक्टिव्हिटी किमान आहे त्याचं अकाऊंट व्हेरिफाय होऊ शकतं. यासाठी त्या व्यक्तीला एक आयडी प्रूफ देखील द्यावा लागेल, ज्यामध्ये नाव आणि फोटो असेल.

यासाठी अर्ज कसा करणार?

सर्वप्रथम about.meta.com/technologies/meta-verified या लिंकवर जा. आणि Facebook किंवा Instagram वर क्लिक करून लॉग इन करा. यानंतर, वेटींग लिस्टमध्ये सामील होण्यासाठी ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर, तुम्हाला अकाऊंट वेरिफाय झाल्याचा ईमेल मिळेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT