विज्ञान-तंत्र

Technology : ॲपल कंपनीचं न्यु जनरेशन भारतात लॉन्च; किंमत ऐकून आश्चर्य वाटेल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : दिवाळीत इलेक्ट्रॉनिक बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. लोकही अनेक दिवसापासून पेंडींग ठेवलेली खरेदी दिवाळी पाडव्याला करतात. याच पार्श्वभूमीवर Apple TV 4K ची न्यु जनरेशन भारतात लॉन्च झाली आहे. Apple TV 4K च्या वाय-फाय मॉडेलची किंमत 14,900 पासून सुरू आहे. याच टिव्हीचे अधीक फिचर्स जाणून घेऊयात.

Apple TV 4K चे दोन मॉडेल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Wi-Fi-only आणि Wi-Fi + Ethernet मॉडेलसोबत Siri Remote सेट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये A15 Bionic चिपसेट वापरण्यात आला आहे. त्यामुळे वीडियो डिकोडिंग, ऑडियो प्रोसेसिंग दर्जेदार होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Apple TV 4K ची किंमत

Apple TV 4K च्या W-Fi only मॉडेलसाठी 14,900 रुपये मोजावे लागतील. या मॉडेलमध्ये 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तर, Wi-Fi + Ethernet मॉडेलची किंमत 16,900 आहे. यामध्ये 128GB मेमरी देण्यात आली आहे.

Apple TV 4K चे स्पेसिफिकेशन्स

Apple TV 4K मध्ये A15 Bionic प्रोसेसर दिला असून तो मागील मॉडेल पेक्षा 50 टक्के अधिक फास्ट आहे. हा प्रोसेसर फास्टर नेविगेशन आणि स्नेपियर UI ऍनिमेशनसह येतो. तर GPU चा परफॉर्मन्समध्ये 30 टक्क्यांपर्यंत सुधारणा करण्यात आली आहे. Apple TV 4K ला HDR10+ चा सपोर्ट देण्यात आला आहे.

या व्यतिरीक्त Dolby Vision ला तो सपोर्ट करतो. हा टीव्ही Dolby Atmos, Dolby Digital 7.1 आणि Dolby Digital 5.1 सराउंड साउंडलाही सपोर्ट करतो. tvOS सहज वापरता यावा यासाठी या टीव्हीसोबत Siri Remote टच-एनेबल्ड क्लिकपॅड देण्यात आले आहे.

घर बसल्या मोठ्या स्क्रिनवर कार्यक्रम बघता यावेत यासाठी Apple TV 4K Apple हा बेस्ट ऑप्शन आहे. आता लॉन्च केलेले मॉडेल सर्वशक्तीशाली आहे. Apple TV 4K कंपनीच्या इतर डिव्हाईससोबत सहज कनेक्ट होतो. त्यामुळे ते सुजर फ्रेंडली आहे. ते नक्कीच लोकांच्या पसंतीस पडेल, अशी माहिती Appleचे वर्ल्डवाइड प्रोडक्ट मार्केटिंग उपाध्यक्ष बॉब बोरचर्स यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT