truecaller  
विज्ञान-तंत्र

Truecaller वरून तुमचे नाव, मोबाईल नंबर कसा हटवाल? या टिप्स फॉलो करा!

एंड्रॉईंड आणि आयफोनवरून तुमची माहिती हटवू शकता

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला तुमची ओळख गुप्त ठेवायची असेल तर ही बातमी वाचाच. कारण अनेकांना ट्रूकॉलरवरील माहिती इतरत्र जाणे त्रासदायक वाटते. म्हणून जर तुम्हाला ट्रूकॉलर (Truecaller) वरून तुमचे नाव आणि मोबाईल (Mobile) नंबर कायमचा हटवायचा असेल तर तसा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही एंड्रॉईंड आणि आयफोनवरून तुमची माहिती हटवू शकता. त्यासाठी या टिप्स फॉलो करा.

Truecaller तुमचा डेटा कसा घेतो?

ट्रूकॉलर युजर्सच्या स्मार्टफोनधील अॅड्रेस बुकद्वारे संपर्काचे डिटेल्स तयार करतो. जर हा डेटा कोणीही वापरला नसला तरीही तुमचा नंबर आणि नाव ट्रूकॉलर च्या डेटाबेसमध्ये आहे. जर तुम्ही हे अॅप वापरत असाल तर तुम्ही तुमचा नंबर या सर्व्हिसवरून हटवू शकत नाही. तुमचा नंबर हटवण्यासाठी तुम्हाला अकाऊंट बंद करावे लागेल. पण, तुमचा नंबर डिलीट करून इतरांचे संपर्क तपशील जाणून घ्यायचे असतील तर ते शक्य नाही. त्यामुळे iPhone आणि Android फोनवर Truecaller खाते कसे डिएक्टीव्हॅट करायचे हे जाणून घेऊ.

Android smartphone

ट्रूकॉलर Android मध्ये निष्क्रिय कसे करावे?

१) सगळ्यात आधी ट्रूकॉलर अॅप ओपन करा.

२) त्यानंतर डाव्या कोपऱ्यात असलेल्या पीपल आयकॉन वर क्लीक करा

३) आका सेंटिग्जवर जा

४) तिथून अबाऊट मध्ये जा. इथे तुम्हाला खाते निष्क्रीय करण्याचा पर्याय दिसेल. तिथे जाऊन खाते निष्क्रीय करा.

I PHONE

ट्रूकॉलर आयफोनवर कसे निष्क्रिय करावे?

ट्रूकॉलर को आईफोन में कैसे करें डीएक्टिवेट

१) सगळ्यात आधी ट्रू कॉलर अॅप ओपन करा.

2) त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या गियर आयकॉनवर क्लिक करा

३) त्यानंतर अबाऊट ट्रूकॉलरवर जा. येथे तुम्हाला सगळ्यात खाली खाते निष्क्रिय करण्याचा पर्याय दिसेल.

४) त्यावर क्लिक करून तुमचे खाते निष्क्रिय करू शकता.

deactivate your account from Truecaller

ट्रूकॉलरवरून तुमचा नंबर कसा हटवाल?

1) आधी ट्रूकॉलरच्या अनलिस्ट पेजवर जा

२) देशाच्या संदर्भात कोड टाकून तुमचा नंबर टाका. उदाहरणार्थ -+911100404040

३) त्यानंतर अनलिस्टसाठी पर्याय निवडून कारण सांगा.

४) त्यानंतर व्हेरिफिकेशन कॅप्चा हा पर्याय पूर्ण करा.

५) त्यानंतर अनलिस्टवर क्लिक करा.

६) असे केल्यानंतर २४ तासांनी ट्रूकॉलर तुमचा नंबर डिलिट करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT