Upcoming Cars esakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

SUV, MPV, इलेक्ट्रिक आणि हाय परफॉर्मन्स सेडान व्यतिरिक्त, बऱ्याच कार्स लाँच होणार

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Cars : यावर्षी म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये, SUV, MPV, इलेक्ट्रिक आणि हाय परफॉर्मन्स सेडान व्यतिरिक्त, बऱ्याच कार्स लाँच होणार आहेत. आज या कार बद्दल थोडं जाणून घेऊ.

Maruti Suzuki Fronx : ही कार पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही कार यावर्षीच्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करण्यात आली होती. या कारचे बुकिंग सुरू झाले असून कंपनीला आतापर्यंत 15,000 बुकिंग मिळाले आहेत. Frons मध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन आणि नवीन 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.

Toyota Innova Crysta Diesel : टोयोटाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एमपीव्हीची पुढची जनरेशन इनोव्हा हायक्रॉसच्या रूपात लॉन्च केली. याशिवाय कंपनी भारतात डिझेलवर चालणारी इनोव्हा क्रिस्टा पुन्हा सादर करणार आहे. त्याची बुकिंग जानेवारी 2023 मध्ये सुरू झाली. टोयोटा पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत Crysta डिझेल मॉडेल पुन्हा लाँच करेल अशी शक्यता आहे.

MG Comet EV : एमजी मोटार पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये भारतीय बाजारपेठेत कॉमेट ईव्ही लाँच करू शकते. एका पूर्ण चार्जवर कॉमेट ईव्ही सुमारे 300 किमीची राईड देऊ शकते. भारतात त्याची अपेक्षित किंमत 15 लाख रुपये आहे.

Mercedes-AMG GT 63 SE : Mercedes-Benz 11 एप्रिल रोजी भारतात AMG मॉडेल लॉन्च करू शकते. या कारला 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे. या पॉवरहाऊस कारला इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. हे इंजिन 843bhp पॉवर आउटपुट आणि 1400Nm टॉर्क जनरेट करते.

Lamborghini Urus S : भारतात 13 एप्रिल रोजी Lamborghini ची Urus Performante लॉन्च होणार आहे. या SUV मध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन असून ते 657bhp आणि 850Nm पीक टॉर्क जनरेट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT