Maruti Suzuki Brezza
Maruti Suzuki Brezza Google
विज्ञान-तंत्र

लवकरच येतायत Maruti च्या 'या' तीन CNG कार; जाणून घ्या खासियत

सकाळ डिजिटल टीम

सीएनजी कारच्या वाढत्या मागणीसह, सर्वच वाहन कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांच्या लेट्स्ट मॉडेल मध्ये सीएनजी पर्याय सादर करण्याचा विचार करत आहेत. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी (बलेनो, सियाझ, ब्रेझा), ह्युंदाई (व्हेन्यू), टाटा (पंच, नेक्सॉन) आणि टोयोटा (इनोव्हा क्रिस्टा) यासह ऑटोमेकर्सकडून सीएनजी हॅचबॅक, सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एमपीव्ही गाड्यांचा समावेश असेल. तुम्हालाही या लोकप्रिय गाड्यांचे सीएनजी व्हेरिएंट घ्यायचे असेल तर ही बातमी पूर्ण वाचा आणि जाणून घ्या त्यांची खासियत.

मारुती बलेनो सीएनजी

इंडो-जॅपनीज ऑटोमेकर आपल्या Arena आणि Nexa उत्पादन लाइनअपमध्ये CNG मॉडेल्स सादर करण्याची योजना आखत आहे. नवीन मारुती बलेनो सीएनजी येत्या काही महिन्यांत रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहे. मॉडेल 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन वापरेल, ज्यामध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किट असेल. गॅसोलीन युनिट 89PS कमाल पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करते. नियमित पेट्रोल मॉडेल 22kmpl पेक्षा जास्त मायलेजचा दावा करते, CNG व्हेरिएंट 25kmpl मायलेज देण्याची शक्यता आहे.

मारुती स्विफ्ट सीएनजी

मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या हॅचबॅकपैकी एक - स्विफ्ट - लवकरच CNG प्रकारात लॉन्च केली जाईल. Dzire CNG प्रमाणे, मारुती स्विफ्ट CNG 1.2-लिटर ड्युअलजेट K12C पेट्रोल इंजिन आणि CNG किटसह येईल. CNG मोडमध्ये, हॅचबॅक 70bhp पीक पॉवर आणि 95Nm पीक टॉर्क जनरेट करेल.

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी

मारुती सुझुकी आपले 2022 मारुती ब्रेझा CNG अशा नवीन लुक आणि फीचर्ससह आणण्यासाठी सज्ज आहे जेणेकरुन ते सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon च्या ग्राहकांना आकर्षित करू शकेल. नेक्स जनरेशन Brezza च्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाडीमध्ये समोर नवीन ग्रिलसह, नवीन बंपर, ट्विन पॉड हेडलॅम्प आणि A-शेप LED DRL दिसतील. यासोबतच नवीन फ्रंट फेंडर्स आणि नवीन डिझाइन केलेले ड्युअल टोन अलॉय व्हील पाहायला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT