Video Call Scam esakal
विज्ञान-तंत्र

Video Call Scam: फोन उचलताच कपडे काढते...अन् मग ब्लॅकमेल; सेक्स्टॉर्शनला नेमकं बळी कसे पडतात लोक?

सेक्स्टॉर्शनला कसे बळी पडतात लोक? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Sextortion: अनेकदा आपण सेव्ह नसलेल्या नंबर वरून कॉल आल्यास बहुतांशी इग्नोर करतो. मात्र हाच कॉल व्हॉट्सअॅपवरून आल्यास आपण बरेचदा उचलतो. मात्र हे करतानाही तुम्हाला आता सावध राहाण्याची गरज आहे. मागल्या अनेक दिवसांपासून सेक्स्टॉर्शनचे अनेक प्रकरण उघडकीस आलेत. याच प्रकरणाला बळी पडणाऱ्या एका व्यक्तीची कथा तुम्हाला आणखी थक्क करेल.

सेक्स्टॉर्शन हे सध्या चर्चेत असलेलं आणि सोशल मीडियावर खळबळ उडवणारा स्कॅम आहे. स्कॅमच्या अगदी काही सेकंदांनी यूजर्सची झोप उडून जाइल असे काहीसे होते. या स्कॅममध्ये यूजरला एक व्हिडीओ कॉल येतो आणि तिथून खऱ्या स्कॅमला सुरूवात होते.

प्रत्यक्षात घडलेली एक थरारक कथा

एका व्यक्तीसह घडलेली ही खरी घटना आहे. हा व्यक्ती संध्याकाळी घरी आलेल्या पाहुण्यांसह गप्पा करत बसला होता. तेवढ्यात त्याला एका अननोन नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. सुरूवातीला त्याने तो इग्नोर केला. मात्र दोन ते तीनदा तोच कॉल आल्यानंतर त्याला तो महत्वाचा वाटला. कॉल उचलताच पुढली महिला त्याला व्हिडीओ कॉलवर कपडे काढताना दिसली. यूजरने कॉल डिस्कनेक्ट करेपर्यंत स्कॅमरचं काम झालेलं होतं.

काही वेळानंतर या व्यक्तीस पैशांची मागणी करणारा ब्लॅकमेलींग कॉल येतो. हा व्यक्ती भीतीने पैसेही देतो. मात्र त्याची समस्या इथेच संपत नाही. या संपूर्ण घटनेत व्यक्तीचा काहीही दोष नसताना त्याला टॉर्चर केल्या जातं. यालाच सेक्स्टॉर्शन असं म्हणतात. अनेक लोक भीतीने पोलिसांत तक्रारही दाखल करत नाही.

असे राहा सावध

स्कॅमर्स स्मार्टली लोकांना त्यांच्या जाळ्यात फसवतात. तसेच एका राज्यात राहून ते दुसऱ्या राज्यातील लोकांना टार्गेट करतात. कॉलींगसाठी ते वेगवेगळ्या नंबरचा वापर करतात. तेव्हा तुम्ही अत्यंत सजग राहाण्याची गरज आहे.

यापासून असे वाचा

कुठल्याही अननोन नंबरवरून व्हिडीओ कॉल आल्यास रीसीव्ह करू नका. महत्वाचा वाटल्यास ऑडिओ कॉल करत चेक करा. अशाप्रकारे तुम्ही सावध राहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT