Traffic Rules Car Video eSakal
विज्ञान-तंत्र

Traffic Challan : कारसोबत फोटो-व्हिडिओ काढताना बरेच जण करतात मोठी चूक; 15 हजारांपर्यंत होऊ शकतो दंड

Traffic Rules : आपल्या वाहनांसोबत कित्येक लोक व्हिडिओ तयार करुन ते इन्स्टाग्राम-यूट्यूब अशा ठिकाणी पोस्ट करतात.

Sudesh

आपल्या गाडीसोबत फोटो-व्हिडिओ काढणं सर्वांनाच आवडतं. कित्येक जण तर खास डीएसएलआर कॅमेऱ्याने आपल्या कारसोबत फोटोशूट करतात. असं फोटोशूट करणं चुकीचं नाही. मात्र, फोटो किंवा व्हिडिओ काढताना केलेल्या काही चुका या तुमचं मोठं नुकसान करू शकतील.

सोशल मीडियावर सध्या रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या वाहनांसोबत कित्येक लोक व्हिडिओ तयार करुन ते इन्स्टाग्राम-यूट्यूब अशा ठिकाणी पोस्ट करतात. आपला व्हिडिओ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काही लोक अजब-गजब प्रकारही करतात.

होऊ शकतो मोठा दंड

आपल्या कारसोबत विचित्र स्टंट करणारे व्हिडिओ बनवल्यास तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. अशाच एका व्हिडिओमुळे उत्तर प्रदेशात एका तरुणीला तब्बल 15,500 रुपयांचा दंड बसला आहे. ट्विटरवर या तरुणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

काय केलं तरुणीने?

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की ही तरुणी चालू कारच्या बोनेटवर बसली आहे. या तरुणीने लग्नात घालतात त्याप्रमाणे पेहराव केला आहे. खास सोशल मीडियावर टाकण्यासाठी ही तरुणी असा व्हिडिओ बनवत होती. प्रयागराजमधील हा व्हिडिओ आहे.

या तरुणीला 15 हजार रुपयांचा दंड बसल्याचं ट्विटर पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे. यापूर्वीही या तरुणीने विना-हेल्मेट दुचाकी चालवली असल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणं हे आपल्यासोबतच दुसऱ्यांसाठीही धोक्याचं असतं. त्यामुळे असं काही करणं टाळून तुम्ही स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव, तसंच आपले पैसेही वाचवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT