Vi Plans
Vi Plans sakal
विज्ञान-तंत्र

Netflix, Hotstar चा फ्री प्लॅन बंद; Vi चा यूजर्सला मोठा झटका

सकाळ डिजिटल टीम

Vodafone-Idea ने (Vi) यूजर्सना मोठा धक्का दिला असून, कंपनीने सर्वाधिक लोकप्रिय REDX पोस्टपेड प्लॅन बंद केले आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे यूजर्समध्ये नाराजी पसरली आहे. REDX या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स डिस्ने+ हॉटस्टारच्या मोफत सबस्क्रिप्शनसह अनेक फायदे देत होते. कंपनीने हे प्लान का बंद केले याबाबत नेमकं कारण समोर आलेले नाही.

सर्वाधिक नफा देणारे होते REDX चे प्लॅन

कंपनीने बंद केलेल्या REDX च्या या प्लॅनमधून सर्वाधिक नफा मिळत होता. यामध्ये 1099, 1699 आणि 2299 चे प्लॅन होते. या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि रोजच्या मोफत एसएमएस व्यतिरिक्त बरेच काही ऑफर देण्यात येत होते. यामध्ये यूजर्स नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टारची विनामूल्य सदस्यता देखील मिळवू शकत होती. उपलब्ध होती.या व्यतिरिक्त, कंपनी या योजनांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवर लाउंज प्रवेश देखील देत असे.कंपनीने हे प्लॅन का बंद केले याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कंपनीने आणले नवे प्लान

दरम्यान, कंपनीकडून जरी REDX चे प्लॅन बंद केले असले तरी, यूजर्ससाठी कंपनीकडून विविध पोस्टपेड प्लॅन ऑफर केले जात आहेत. यामध्ये पर्सनल आणि फॅमिली पॅक असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

पर्सनल प्लानमध्ये 399, 499 आणि 699 रुपयांचे प्लॅन आहेत. यामध्ये कंपनी अनलिमिटेड डेटा देत आहे. याशिवाय या प्लॅन्समध्ये प्राइम व्हिडिओ, zee 5 आणि डिस्ने + हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT