Whatsapp Remind Me Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Remind Me : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एका गेमचेंजर फिचरची एंट्री, कसे वापराल 'रिमाइंड मी', जाणून घ्या एका क्लिकवर..

Whatsapp Remind Me Feature : व्हॉट्सअ‍ॅपने 'रिमाइंड मी' नावाचं नवीन फीचर चाचणीसाठी सुरू केलं आहे.

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • व्हॉट्सअ‍ॅपने 'रिमाइंड मी' फीचर बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केलं आहे.

  • या फीचरद्वारे वापरकर्ते मेसेजसाठी विशिष्ट वेळेचा रिमाइंडर सेट करू शकतात.

  • हे फीचर लवकरच सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी रोलआउट होण्याची शक्यता आहे.

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपने एक नवे स्मार्ट फीचर चाचणीसाठी सुरू केले आहे, जे विसरलेले किंवा दुर्लक्षित मेसेज पुन्हा लक्षात आणून देईल. या नव्या फीचरचे नाव आहे ‘रिमाइंड मी’.

अनेकदा आपल्याला एखाद्या सहकाऱ्याचा प्रश्न विचारपूर्वक उत्तर देण्यासाठी थोडा वेळ हवा असतो, किंवा एखादा वैयक्तिक मेसेज लगेच उत्तर न देता नंतर हाताळायचा असतो. पण हे मेसेज नंतर विसरले जातात. आता व्हॉट्सअ‍ॅपचे ‘रिमाइंड मी’ फीचर ही अडचण सोडवणार आहे. यामुळे वापरकर्ते ठराविक वेळानंतर अनरेड (unread) मेसेजबद्दल सूचना मिळवू शकतील.

हे फीचर कसं काम करतं?

WABetaInfo च्या माहितीनुसार, हे फीचर सध्या Android बीटा अपडेट 2.25.21.14 मध्ये उपलब्ध आहे. वापरकर्ते एखाद्या मेसेजवर क्लिक करून, तीन बिंदू असलेल्या मेन्यूवर जाऊन ‘Remind me’ हे ऑप्शन निवडू शकतील.
यामध्ये २ तास, ८ तास किंवा २४ तास असे पूर्वनिश्चित वेळेचे पर्याय असतील. याशिवाय हवे असल्यास वापरकर्ता स्वतःची तारीख व वेळही सेट करू शकेल.

एक छोटं आयकॉन देईल आठवण

जेव्हा एखाद्या मेसेजसाठी रिमाइंडर सेट केला जातो, तेव्हा त्या मेसेज बबल एक छोटंसं बेल आयकॉन दिसू लागेल. ठराविक वेळ झाली की अ‍ॅप पुन्हा त्या मेसेजबद्दल सूचना देईल, आणि कोणत्या चॅटमधून तो मेसेज आला होता हेही स्पष्ट दाखवेल.

‘क्विक रिकॅप’

यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक नवं फीचर ‘Quick Recap’ देखील चाचणी करत आहे. याच्या माध्यमातून वापरकर्ते कोणत्याही चॅटचा थोडक्यात आढावा घेऊ शकणार आहेत – म्हणजे प्रत्येक मेसेज वाचण्याची गरज नाही. हे फीचर Meta AI च्या सहाय्याने चालणार आहे.

‘रिमाइंड मी’ हे फीचर खासकरून अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, जे मेसेज वाचून सुद्धा लगेच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. हे एक प्रोडक्टिव्हिटी वाढवणारं आणि सोयीचं फीचर असून व्हॉट्सअ‍ॅपच्या स्मार्ट वापराकडे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.

सध्या हे फीचर बीटा वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असलं, तरी लवकरच सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी ते रोलआउट होण्याची शक्यता आहे.

FAQs

  1. प्रश्न: 'रिमाइंड मी' फीचर नेमकं काय आहे?
    उत्तर: हे फीचर वापरकर्त्यांना विशिष्ट मेसेजसाठी रिमाइंडर सेट करण्याची सुविधा देते.

  2. प्रश्न: हे फीचर सध्या कुठे उपलब्ध आहे?
    उत्तर: हे सध्या WhatsApp च्या Android बीटा व्हर्जन 2.25.21.14 मध्ये उपलब्ध आहे.

  3. प्रश्न: रिमाइंडर कसा सेट करायचा?
    उत्तर: मेसेज सिलेक्ट करून, तीन बिंदू असलेल्या मेन्यूवर क्लिक करून 'Remind Me' पर्याय निवडावा लागतो.

  4. प्रश्न: कोणते वेळापत्रक पर्याय मिळतात?
    उत्तर: २ तास, ८ तास, २४ तास आणि कस्टम वेळ निवडता येते.

  5. प्रश्न: फीचर सर्वांना केव्हा मिळेल?
    उत्तर: सध्या बीटा टेस्टिंग सुरू असून लवकरच हे सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT