WhatsApp OS Support eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp : आजपासून लाखो मोबाईलमध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; तुमचा फोन तर नाही लिस्टमध्ये?

यामध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या मोबाईलचा समावेश आहे.

Sudesh

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश होतो. भारतात देखील या अ‍ॅपचे अब्जावधी यूजर्स आहेत. या सर्व यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. आजपासून (24 ऑक्टोबर) कित्येक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. यामध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या मोबाईलचा समावेश आहे.

आजपासून व्हॉट्सअ‍ॅप हे केवळ अशा मोबाईलमध्ये चालणार आहे, ज्यामध्ये अँड्रॉईड 5.0 किंवा त्याहून पुढची ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध आहे. आयफोनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, केवळ iOS 12 आणि त्यापुढील व्हर्जनच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअ‍ॅप उपलब्ध असेल. जिओफोनमध्ये KaiOS 2.5.0 आणि त्यापुढील व्हर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करेल. याहून जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

अशी तपासा ऑपरेटिंग सिस्टीम

तुमच्या फोनमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे तपासण्यासाठी सर्वात आधी सेटिंग्समध्ये जावं लागेल. यानंतर स्क्रोल डाऊन करुन 'अबाउट फोन' हा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीम आणि अँड्रॉईड व्हर्जन दिसेल. जर हे व्हर्जन 5.0 पेक्षा जुनं असेल, तर तुम्हाला त्वरीत ओएस अपडेट करुन घ्यावी लागेल. (Tech News)

या मोबाईलमध्ये चालणार नाही

काही मोबाईलमध्ये ठराविक मर्यादेपर्यंतच ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करता येते. त्यामुळे या फोनमध्ये आजपासून व्हॉट्सअ‍ॅप चालण्याची शक्यता आजिबातच नसणार आहे. अशा मोबाईलची यादी पुढीलप्रमाणे -

सॅमसंग

  • Samsung Galaxy S2

  • Samsung Galaxy Nexus

  • Samsung Galaxy Tab 10.1

  • Samsung Galaxy S

एचटीसी

  • HTC Desire 500

  • HTC One

  • HTC Sensation

  • HTC Desire HD

सोनी

  • Sony Ericsson Xperia Arc3

  • Sony Xperia S2

  • Sony Xperia Z

इतर

  • Nexus 7

  • iPhone 5

  • iPhone 5c

  • Archos 53 Platinum

  • Grand S Flex ZTE

  • Grand X Quad V987 ZTE

  • Huawei Ascend D

  • Huawei Ascend D1

  • LG Optimus G Pro

  • LG Optimus 2X

  • Motorola Droid Razr

  • Motorola XoomAsus Eee Pad Transformer

  • Acer Iconia Tab A5003

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT