wikipedia launching social media site WT social co founder Jimmy Wales announcement 
विज्ञान-तंत्र

फेसबुक, ट्विटरला तगडी टक्कर; ‘डब्लूटी’ सोशल मीडियातला नवा भिडू

अशोक जावळे

फेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटला कंटाळलेल्यांची संख्या सध्या प्रचंड मोठी आहे. तुम्हीही जर फेसबुक आणि ट्विटरला कंटाळला असाल आणि नव्या पर्यायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फेसबुक आणि ट्विटरला तगडी टक्कर देण्यासाठी विकिपिडिया या जगप्रसिद्ध संकेतस्थळाच्या निर्मात्याने कंबर कसली असून,  ‘डब्लूटी : सोशल’ हा नवा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. ‘डब्लूटी : सोशल’  हे युजर्सच्या अपेक्षांवर किती खरे उतरते हे पाहण्यासाठी आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. मात्र, सर्वांत आनंदाची बातमी ही आहे की ‘डब्लूटी : सोशल’  हा प्लॅटफॉर्म जाहिरातदारांच्या पैशांवर चालणार नसून, त्यासाठी देणग्यांच्या रुपाने निधी उभारण्यात येणार आहे.

काय आहे  ‘डब्लूटी : सोशल’?
विकिपिडिया माहिती नाही असा माणूस शोधून काढणे तसे अवघडच म्हणायला हवे. माहितीची खजिना असलेली ही वेबसाईट उठता बसता चेक केल्याशिवाय अनेकांचे पान हालत नाही. माहितीचा खजिना उपलब्ध करून देणाऱ्या विकिपिडियाचा उपयोग संदर्भ शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. जिम्मी वेल्स हे विकिपिडियाचे सहसंस्थापक. तर, जिम्मी भाऊंच्या मनात आले आणि त्यांनी दोन वर्षांपूर्वी विकिट्रिब्यून हे संकेतस्थळ लाँच केले. फेक न्यूजच्या राक्षसाला गाडून टाकण्याच्या उद्देशनाने जिम्मू भाऊंनी ही सगळी खटपट केली होती. फेक न्यूजचा मुकाबला करण्याचा विडा उचललेल्या विकिट्रिब्यूनवर रिपोर्टर्स आणि सिटिझन जर्नालिस्ट यांनी दिलेल्या ओरिजनल बातम्या प्रसिद्ध केल्या जात होत्या. मात्र, आजच्या दुनियेला चांगल्या प्रयत्नांचे वावडे आहे हेच, विकिट्रिब्यूनच्या बाबतीत खरे ठरले. थोडक्यात काय तर ऑनलाईन जगाने या प्रयोगाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. मात्र, जिम्मी वेल्स अपयशाने खचून जाणाऱ्यातील माणूस नाही हे तुम्हा ठाऊक असलेच. त्यांनी नव्या उमेदीने काम सुरू केले आणि आता दोन वर्षांनंतर विकिट्रिब्यूनचाच नवा अवतार घेऊन ते मैदानात उतरले आहेत. त्याचे नामकरण करण्यात आले ‘डब्लूटी : सोशल’.

जाहिरातींच्या त्रासापासून मुक्तता
सोशल नेटवर्किंग साईट आणि न्यूज शेअरिंग प्लॅटफॉर्म से ‘डब्लूटी : सोशल’  या नव्या माध्यमाचे स्वरुप असणार आहे. फेसबुक आणि ट्विटरला ‘डब्लूटी : सोशल’  तगडी फाइट देईल असा जिम्मी भाऊंना विश्वास आहे. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस् प्रमाणे ‘डब्लूटी : सोशल’ वरही युजर्स लेख, माहिती, बातम्या शेअर करू शकणार आहेत. इथे जाहिरातींची कटकट नसणार आहे, हा सर्वांत मोठा दिलासा आहे. जाहिरातींवर आधारीत बिझनेस मॉडेल हा झाडून सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसचा जीव की प्राण असतो. मात्र, जिम्मी भाऊंनी या मॉडेलला कात्रजचा घाट दाखवून ‘डब्लूटी : सोशल’  हे जाहिरातींविना चालेल आणि तेही देणगीदारांनी दिलेल्या देणग्यांच्या आधारे. ‘डब्लूटी : सोशल’ वर यूजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल असे आश्वासन खुद्द जिम्मी वेल्स यांनी दिले आहे.

अल्गोरिदमच्या बाजारला टाटा?
दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो ‘डब्लूटी : सोशल’ अल्गोरिदमच्या बाजार उठविण्याच्या मागे लागले आहे. कारण सर्वोधिक लाईक किंवा कमेंट असलेल्या पोस्ट तुम्हाला सर्वांत वर दिसणार हे इतर सोशल प्लॅटफॉर्मसचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अल्गोरिदमसचा वापर केला जातो. डब्लूटी : सोशल वर मात्र, नव्या पोस्ट आधी दिसणार आहेत. छोट्या छोट्या कम्युनिटिंची ‘डब्लूटी : सोशल’ वर चलती असणार आहे. ऑनलाइन जगातील छोट्या कम्युनिटीज किती फास्ट असतात हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. फेक न्यूजला दणका हे जिम्मी भाऊंचे धोरण असल्याने कुठल्याही फेक न्यूज किंवा फेक माहितीला या प्लॅटफॉर्मवर स्थान असणार नाही. त्याच वेळी खोट्या बातम्या किंवा माहिती पेरणाऱ्यांना हाकलून देणे हे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे ‘डब्लूटी : सोशल’  च्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. चुकीच्या गोष्टींना चूक म्हणण्यात आम्ही अजिबात बिचकणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. अशा या ‘डब्लूटी : सोशल’ च्या यूजर्सची संख्या वेगाने वाढते आहे. तब्बल 50 ते 500 मिलियन यूजर्सचा टप्पा गाठण्याचे डब्लूटी : सोशलचे उद्दीष्ट आहे. सध्या तरी अनेक आघाड्यांवर सरस दिसणारा हा सोशल नेटवर्किंगचा नवा कोरा पर्याय यूजर्सला कितपत आकर्षित करतो याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

तुमची प्रायव्हसी कायम ठेवून तुम्हाला सोशल नेटवर्किंगचा अॅड-फ्री प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आम्ही विडा उचलला आहे. तुमचा कुठलाही डेटा आम्ही विकणार नाही. फेक न्यूजला आळा घालणे आणि यूजर्सला चांगला कंटेंट देण्यास ‘डब्लूटी : सोशल’ चे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. त्यासाठी देणगीदारांनी पुढे येवून आमच्या चांगल्या प्रयत्नांना बळ द्यावे.
- जिम्मी वेल्स, सहसंस्थापक, डब्लूटी : सोशल आणि विकिपिडिया  

आणखी बातम्यांसाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT