Xiaomi Smart TV Sakal
विज्ञान-तंत्र

Xiaomi Smart TV: चक्क निम्म्या किंमतीत मिळतोय मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या ऑफर

३२ इंच Xiaomi Smart TV 5A HD Ready LED Android TV बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi Smart TV Offer: शाओमीच्या दमदार फीचर्ससह येणाऱ्या स्मार्ट टीव्हीला निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ३२ इंच Xiaomi Smart TV 5A HD Ready LED Android TV बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Xiaomi Smart TV 5A HD Ready LED Android TV ची किंमत

Xiaomi Smart TV 5A HD Ready LED Android TV ची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १३,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. एवढेच नाही तर टीव्ही खरेदी करताना IndusInd बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तसेच, प्रीपेड ऑर्डर्सवर १ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट दिले जात आहे.

हेही वाचा: Ptron Bassbuds Epic: एकापेक्षा एक शानदार फीचर्ससह नवीन इयरबड्स लाँच, किंमत फक्त...

Xiaomi Smart TV 5A HD Ready LED Android TV चे फीचर्स

Xiaomi Smart TV 5A HD Ready LED Android TV मध्ये ३२ इंच एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. टीव्हीमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा टीव्ही क्वॉड कोर कॉर्टेक्स ए३५ चिपसेटसह येतो. यात साउंडसाठी २० वॉटचे स्पीकर दिले आहेत.

शानदार ऑडिओ क्वॉलिटीसाठी यात डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट दिला आहे. पॅचवॉल ४ सह येणारा शाओमीचा हा टीव्ही अँड्राइड टीव्ही ११ वर काम करतो. यात इन-बिल्ट क्रोमकास्टसह IMDb Integration देण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी दोन एचडीएमआय, दोन यूएसबी पोर्ट, एक ईथरनेट पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळेल. तसेच, Wi-Fi ८०२.११ a/b/g/n/ac (२x२ MIMO) आणि ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट मिळतो.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT