Himachal Tourism  esakal
टूरिझम

Himachal Tourism : ‘ये हसी वादिया, ये खुला आसमा’; जोडीदारासोबत हिमाचल टूर म्हणजे स्वर्गसुखच!

एका बाकड्यावर जोडीदाराचा हात हातात घेऊन सुर्यास्त पाहणे म्हणजे स्वप्नवतच

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात गाण्यांमध्ये ‘ये हसी वादिया, ये खुला आसमा’, असे निसर्ग सौंदर्य दाखवले जाते. जे पाहून आपणही कधीतरी या ठिकाणी जायला हवे. तूम्हाला माहितीही नसेल पण, यापैकी अनेक गाण्यांचे लोकेशन्स हे भारतातीलच काश्मिर, हिमाचल, उत्तराखंडमधील पर्वतरागांमध्ये शुट झालेले असते.

हिमाचल प्रदेश हे देशातील सुंदर पर्यटन स्थळांचा केंद्रबिंदू मानला जातो. हिमाचल प्रदेशात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण तुम्ही बरमाना बद्दल ऐकले आहे का?. जर तुम्ही हिमाचल प्रदेशला भेट देण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी बरमानाची सहल सर्वोत्तम ठरू शकते.

बरमानाच्या काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊन तुम्ही तुमचा प्रवास खास आणि संस्मरणीय बनवू शकता. मनाली, कुल्लू व्हॅली आणि स्पिती व्हॅलीसह हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, या दिवसांत बरमाना येथे पर्यटकांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

बरमाना पार्क

बरमाना पार्क बर्फाच्छादीत पर्वतांच्या मध्यभागी वसलेले शहर आहे. हे पार्क पर्यटकांची पहिली पसंती मानली जाते. तर,बरमाना पार्कमधून तुम्ही हिमालयातील सुंदर पर्वत पाहू शकता. परंतु पार्कमध्ये काही वेळ खेळून तुम्ही तुमची टूर अधिक खास बनवू शकता.

लाघाट ट्रेक

लाघाट ट्रेक पार केल्यावर तूम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य देखील पाहू शकता. सायंकाळच्या वेळी उंच ठिकाणावर असलेल्या एका बाकड्यावर जोडीदाराचा हात हातात घेऊन सुर्यास्त पाहणे म्हणजे स्वप्नवतच वाटेल. लघाटचा ट्रेकिंग करताना उंच पर्वत आणि पाइनची उंच झाडे तुमचा प्रवास संस्मरणीय बनवतात.

इंडिया ग्राउंड

इंडिया ग्राउंडला भेट देणे हे निसर्गप्रेमींसाठी अद्भूत अनुभव देणारे ठरेल. कारण, इंडिया ग्राउंडमध्ये, तुम्ही विविध झाडे, वनस्पती तसेच सुंदर फुले आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांचे थवे पाहू शकता. इंडिया ग्राउंडवरून तुम्हाला संपूर्ण बरमाना शहर सहज पाहता येते. ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही इंडिया ग्राउंडवर जाऊ शकता.

शिमला ते बरमाना हे अंतर फक्त 85 किमीचे आहे. त्यामूळे हिमाचल टूरचे नियोजन करताना, बरमाना येथील पुरातन अशा लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन तुम्ही तुमचा प्रवास खास बनवू शकता.

या ठिकाणी पर्यटकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते. त्यामूळे तूम्हालाही तूमचा हनिमून किंवा ग्रुप टूर अगदी खास बनवायची असेल तर हिमाचलच्या या बारमानाला नक्की भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT