Places Near to Visit Pune
Places Near to Visit Pune esakal
टूरिझम

Places Near Pune : पुण्यात राहतात अन् या १० गोष्टी नाही केल्या तर तुम्ही काहीच नाही केलं...

सकाळ डिजिटल टीम

Places Near to Visit Pune : पुण्यात अनेक लोकं आपल्या शिक्षणासाठी, कामासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. अर्थात पुणे तिथे काय उणे, इथे अनेक देश-विदेशातले पर्यटक फिरायला येत असतात, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्याच पाहिजेत. पुणे हे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, नैसर्गिक आकर्षणे आणि ऐतिहासिक स्थळांनी भरलेले आहे, अशात तुम्ही पुण्याच्या या १० ठिकाणी गेला नसाल तर तुम्ही पुणे फिरला आहात असं म्हणणं जरा चुकीचं आहे. बघूया अशा जागा तरी नक्की कोणत्या आहेत?

१०. पाताळेश्वर लेणी

प्रभू महादेवांना समर्पित, पाताळेश्वर गुंफा मंदिर हे भारतातील प्रभावी रॉक आर्किटेक्चरचे साक्षीदार असलेले एक उत्तम ठिकाण आहे. हे मंदिर ८ व्या शतकातील आहे आणि इथले आर्किटेक्चर, आश्चर्यकारक वास्तुकला, मनोरंजक प्राचीन कथा आणि गुहेच्या मंदिरात असलेल्या असंख्य शिल्पांद्वारे मनोरंजन केले जाईल.

९. आगा खान पॅलेस

आगा खान पॅलेस ही सुलतान मोहम्मद शा आगा खान III याने १८९२ मध्ये बांधलेली एक मोठी रचना आहे. तिच्या अप्रतिम आतील आणि बाह्य वास्तू सौंदर्यासोबतच, ही इमारत भारतातील सर्वात महत्त्वाच्या आकर्षणांपैकी एक आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान, महात्मा गांधी त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे जवळचे सहकारी महादेव देसाई यांच्यासमवेत येथे तुरुंगात होते. हा राजवाडा आता भारताचे राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखला जातो.

८. कोरेगाव पार्क

कोरेगाव पार्क हे पुण्यातील एक खूप पॉप्युलर ठिकाण आहे,तिथली आलिशान जीवनशैली, आजूबाजूचे कॉर्पोरेट सेक्टर एकंदरीत पुण्यात फॉरेनला असल्याचा किंवा वेस्ट कल्चरचा फील घेयचा असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे. गार्डन्स, मॉल, सिनेमा हॉल, नाईट क्लब, इंटरनॅशनल रेस्टॉरंट आणि बऱ्याच लक्झरी गोष्टी इथे सापडतील.

७. ओशो आश्रम

पुण्यात भेट देण्यासाठी अनेक प्रेरणादायी नैसर्गिक क्षेत्रे आहे पण ओशो आश्रम त्यात भारी आहे. लोकप्रिय कोरेगाव पार्कमध्ये स्थित, हे मेडिटेशन रिसॉर्ट आत्म-चिंतन, शांतता आणि मानसिक आरोग्यासाठी योग्य ठिकाण आहे. इथे एक गेस्ट रुम आहे जिथे तुम्ही राहू शकतात आणि तिथल्या अनेक अॅक्टिविटीमध्ये सहभागी होऊ शकतात.

६. तोरणा किल्ला

पुणे शहराच्या आजूबाजूला अनेक किल्ले आहेत पण त्यातला एक जरासा कठीण आणि महत्वाचा किल्ला म्हणजे तोरणा. याच किल्ल्यावर महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते. स्वतःला ट्रेकिंग साठी आव्हाहन देण्याची इच्छा आहे? मग हा किल्ला परफेक्ट आहे.

५. एम्प्रेस गार्डन

एम्प्रेस गार्डन हे पुण्यातील एक हिरवेगार नंदनवन आहे जिथे विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडे दिसतील. पूर्ण गार्डन हे तब्बल ३९ एकरमध्ये व्यापलेले आहे आणि वनस्पती आणि झाडांच्या रंगीबेरंगी संग्रहासोबत मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी अन् पिकनिकचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

४. खडकवासला धरण

ठिके, पुण्यात समुद्र नाही... पण खडकवासला धरण आणि आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य काही कमी नाही. मुठा नदीचे विस्मयकारक दृश्य, एकबाजूला सगळा डोंगराळ प्रदेश आणि सतत वाहत पाणी हा अनुभव जगातभारी आहे.

३. सारसबाग

पेशव्यांनी बांधलेलं हे सुंदर गणपतीचं मंदिर आहे, आधी याला तळ्यातला गणपती म्हणूनही ओळखायचे कारण त्याकाळी मंदिराच्या आजूबाजूला नदी होती जी कालांतराने बुझवली गेली. एकूण २५ एकरमध्ये हे उद्यान असून भरपूर झाडे आजूबाजूला आहेत, शिवाय सारसबाग चौपाटी ही पुण्यातली एक फेमस चौपाटी आहे.

२. पुणे आदिवासी संग्रहालय

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी पुणे आदिवासी संग्रहालय हे एक उत्तम ठिकाण आहे. इथे छायाचित्रे, चित्रे आणि शिल्पांच्या स्वरूपात हजाराहून अधिक सांस्कृतिक प्रदर्शने पाहायला मिळतील. या संग्रहालयात अनेक हस्तकला, ​​दागिन्यांचे तुकडे, मूर्ती, शस्त्रे आणि इतर अनेक कलाकृती आहेत ज्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनशैलीबद्दल बरेच काही प्रकट करतात.

१. पुण्याचे जेवण

एक कोणतातरी पदार्थ किंवा एक ठिकाण सांगणं जरा अशक्य. पुण्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी सोबत अगदी आधुनिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ सुद्धा खायला मिळतील. त्यातल्या त्यात, सुजाता मास्तनीची मस्तानी, वैशाली आणि रुपाली या हॉटेल मधले जेवण, सारसबागेची चौपाटी, चितळेंची बाकरवडी, सुदाम्याचे पोहे, गुडलकचा बनमस्का हे आणि असे अनेक ठिकाणे आहेत जे खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT