Chinese company penalized for wrongful employee termination — a landmark case reinforcing labor rights and fair workplace laws.
esakal
Chinese company fined heavily for unfairly firing an employee: आजकाल खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढल्याचे आपल्याला दिसून येते. अनेकदा मग यामधून कर्मचारी आणि कंपनीत वादही उद्भवतात. तर अनेकदा कंपनी त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करत कामावरून काढूनही टाकते. तसं पाहीलं तर यामध्ये कर्मचाऱ्याचंच नुकसान होतं, कारण त्याचा जॉब गेलेला असतो. कंपनीला त्या जागी दुसरा कर्मचारी कामावर ठेवून कामकाज सुरळीत चालू ठेवते, एखादा कर्मचारी गेल्याने कंपनीला फारसा फरक पडतही नसतो.
मात्र चीनमध्ये अशी एक घटना समोर आली आहे की, एका कंपनीला कर्मचाऱ्याला कामावरून काढणं चांगलंच महागात पडलं आहे. त्या कर्मचाऱ्यांने केलल्या कृतीमुळे संबंधित कंपनीला मोठा आर्थिक दणका बसला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या घटनेची बातमी व्हायरल होत असून, यावरून सोशल मीडियावर आता चर्चाही रंगल्या आहेत.
एका कर्मचाऱ्याने पाय दुखत असल्याने कामावरून सुट्टी घेतली होती, मात्र त्याच्या मोबाइल अपवर नोंद झालेल्या १६ हजार पावलांनी त्यांच्या नोकरीवर गदा आली. ही घटना चीनमधील जियांगसू प्रांतामधील असल्याची माहिती समोर आली आहे. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याने कंबरेला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी दिलेल्या विश्रांतीच्या सल्ल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट आणि रूग्णालयाचे रिपोर्ट सादर करत, अधिकृतपणे सीक लिव्ह घेतली होती. कंपनीनेही तेव्हा त्याला रजा मंजूर केली होती. मात्र साधारण महिनाभरानंतर जेव्हा तो कर्मचारी पुन्हा कामावर आला तेव्हा काही तास काम केल्यानंतर त्याने पुन्हा रजा मागितली. यावेळी त्याने सांगितले की त्याचा पाय प्रचंड दुखत आहे.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरत्याला हीलस्पर नावाचा आजार झाल्याचे सांगितले आणि सात दिवस पूर्ण आराम सांगितला. मात्र कंपनीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि म्हटले की जर पायाला एवढा त्रास होत होता तर मग तू १६ हजार पावलं चाललासच कसा? कंपनी तपास सुरू करून कर्मचाऱ्याच्या मोबाइल अप मधून हे रेकॉर्ड शोधून काढलं होतं. याशिवाय, सीसीटीव्ही फुटेजही दाखवले, ज्यात तो कर्मचारी ऑफिसला पळत येताना दिसत होता.
या आधारावर, कंपनीने त्याच्यावर अनुशासनहीनतेचा आरोप लावला आणि त्याला नोकरीवरून काढलं. मग त्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले. त्याने असा युक्तिवाद केला की मोबाइल अॅपवर रेकॉर्ड केलेला पावलांचा डेटा पूर्णपणे अचूक नाही आणि तो पुरावा म्हणून मानला जाऊ शकत नाही. त्याने असा युक्तिवाद केला की त्याने आधीच सर्व वैद्यकीय अहवाल, स्कॅन आणि डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर केले आहेत, ज्यामुळे त्याचा आजार स्पष्टपणे सिद्ध झाला आहे.
अखेर हा खटला कामगार न्यायाधिकरणात पोहोचला. सुनावणीदरम्यान, दोन्ही बाजूंनी त्यांचे युक्तिवाद सादर केले. दीर्घ सुनावणीनंतर, न्यायाधिकरणाने कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिला. केवळ डिजिटल अॅप्स किंवा मोबाईल डेटाच्या आधारे कर्मचाऱ्याच्या आजारावर किंवा प्रामाणिकपणावर शंका घेणे चुकीचे आहे हे न्यायालयाने मान्य केले. न्यायालयाने कंपनीला कर्मचाऱ्या बडतर्फीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचे आणि त्याला अंदाजे ११८,००० युआन म्हणजेच अंदाजे १५ लाखा रुपये देण्याचे आदेश दिले.
कंपनीने या निर्णयाला आव्हान दिले आणि केस उच्च न्यायालयात नेली, परंतु तेथील निर्णय देखील कर्मचाऱ्याच्या बाजूने गेला. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की केवळ अॅप डेटाच्या आधारे एखाद्याला दोषी ठरवणे किंवा नोकरीवरून काढून टाकणे बेकायदेशीर आहे. तसेच परवानगीशिवाय एखाद्याच्या खासगी मोबाईलची माहिती मिळवणे देखील गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.