Mother saves child from speeding truck CCTV Footage Viral video esakal
Trending News

Mother Video : शेवटी आईचं काळीज! स्वतः भरधाव ट्रकखाली गेली; पण वाचवला बाळाचा जीव, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Mother saves child from speeding truck CCTV Footage Viral video : भरधाव ट्रकसमोर आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आईने स्वतःचा जीव धोक्यात घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Saisimran Ghashi

  • आईने स्वतःचा जीव धोक्यात घालून बाळाचा जीव वाचवला.

  • व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • नेटकऱ्यांनी आईच्या धैर्याचं आणि प्रेमाचं भरभरून कौतुक केलं.

Child Accident Video : आई म्हणजे त्याग, माया आणि निस्सीम प्रेमाचं मूर्त रूप. संकटाच्या क्षणी स्वतःचा विचार न करता आपल्या लेकरासाठी उभी ठाकणारी आई, हीच खरी 'देवाची' साकार मूर्ती असते, याचं जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका थरारक व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

या धक्कादायक घटनेत एका आईने आपल्या लेकराच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी स्वतः मृत्यूच्या दाढेत जाण्याचं धाडस केलं आणि तिचे मातृत्व पाहून अनेक नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, एक महिला आपल्या चिमुकल्या बाळासह बाईकवर मागे बसली आहे. सर्व काही सुरळीत चाललेलं असतानाच अचानक समोरून एक भरधाव ट्रक येतो आणि काही क्षणांतच ती बाईक ट्रकच्या धडकेत रस्त्यावर फेकली जाते. या अपघातात चिमुकल्याचा जीव क्षणात जाऊ शकला असता, मात्र त्या आईने प्रसंगावधान राखत आपल्या लेकराला झटकन मागे ओढून ट्रकच्या चाकाखाली जाण्यापासून वाचवलं.

स्वतः गंभीर संकटात असूनसुद्धा आईनं अत्यंत धैर्यानं आणि तत्परतेनं आपल्या बाळाचा जीव वाचवला. हा थरकाप उडवणारा क्षण @shubham_creator_07_ या इन्स्टाग्राम युजरने आपल्या अकाउंटवर शेअर केला असून या व्हिडीओला अल्पावधीतच चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओसह दिलेली कॅप्शन सुद्धा अनेकांच्या काळजाला भिडणारी आहे "शेवटी आई ती आईच असते, स्वतः मरणाला आडवं जाऊन ती लेकराचा जीव वाचवते."

व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, "सुखद गोष्ट ही की आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत." तर दुसऱ्यानं म्हटलं, "आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाची मूर्ती. स्वतःचं काहीही न वाटता मुलांसाठी लढणारी ती एकमेव असते." तिसऱ्याने लिहिलं, "देव दिसत नसला तरी तो आईच्या रूपात नक्की भेटतो."

FAQs

1. What happened in the viral video involving the mother?
त्या व्हिडीओमध्ये आईने भरधाव ट्रकपासून आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.

2. Where was the mother and child when the incident happened?
आई आणि बाळ बाइकवर मागच्या सीटवर होते, जेव्हा ट्रक समोरून आला.

3. How did the mother save the child?
आईने प्रसंगावधान राखून बाळाला झटकन मागे ओढून ट्रकच्या चाकाखाली जाण्यापासून वाचवलं.

4. How did netizens react to the video?
नेटकऱ्यांनी तिच्या धाडसाचं कौतुक करत तिला 'खरी देवदूत' असं संबोधलं.

5. Why is the video considered emotional and inspiring?
कारण आईने जीवाची पर्वा न करता आपल्या बाळासाठी धाडस केलं, हे खूपच भावनिक आणि प्रेरणादायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT