esakal

Trending News

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Jhansi-Andaman Express incident Viral video News :या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Mayur Ratnaparkhe

Food Vendor Assaults Passenger with Belt Inside Train : झाशी येथून एक संतापजनक आणि तेवढीच धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका रेल्वेत प्रवाशाने जेवण महाग आहे असं म्हटल्यामुळे त्याला विक्रेत्यांनी चक्क कमरेचा पट्टा काढून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्राप्त माहितीनुसार ही घटना अंदमान एक्स्प्रेसमधील आहे. या रेल्वेत एक प्रवासी आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होता. यावेळी त्याने एका विक्रेत्यास जेवणाची ऑर्डर दिली. यावर त्या विक्रेत्याने १३० रुपयांची थाळी दिली. मात्र ही थाळी प्रत्यक्षात ११० रुपयांचीच होती. परंतु त्याने २० रुपये वाढवून सांगिलते होते. हे जास्तीचे २० रुपये देण्यास संबंधित प्रवाशाने नकार दिला, त्यामुळे संतप्त झालेल्या विक्रेत्याने आपल्या साथीदारांसह त्या प्रवाशाला बेदम मारहाण केली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वेच्या त्या डब्ब्यात एकच गोंधळ उडाला होता. तो प्रवासी ओरडत होता, तर अन्य प्रवासी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो विक्रेता कमरेचा पट्टा काढून त्या प्रवाशाला बेदम मारहाण करत होता. यावेळी त्या प्रवाशाचे कुटुंबीय देखील प्रचंड घाबरले होते आणि रडत होते. हा सर्व प्रकार ऱेल्वेतील एक प्रवाशाने मोबाइलमध्ये शूट केला आहे.

अखेर रेल्वेच्या बोगीत उपस्थित असणाऱ्या काही प्रवाशांनी, त्या प्रवाशाचा बचाव केला. तेव्हा कुठं तो विक्रेता मागे हटला. मात्र तोपर्यंत त्याला बेदम मारहाण झाली होती. या घटनेबाबत पीडित प्रवासी निहाल सिहं यांने एक्सवर तक्रार करत पोस्ट केली आहे.

रेल्वेने या घटनेवर काय म्हटलय? -

रेल्वेत विक्रेत्यांकडून प्रवाशाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ पाहून, सर्वसामान्यांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका सुरू केली आहे. रेल्वेत प्रवास केला तर बेल्टने मारहाण मोफत मिळते का? असा प्रश्न काहींनी सोशल मीडियाद्वारे विचारले. तर या घटनेचे गांभीर्य पाहून आणि प्रवाशांचा वाढता रोष लक्षात घेत झाशी मंडळचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘’या घटनेची माहिती घेतली आहे. जीआरपीने कारवाई करायला हवी होती. याबाबत तक्रार का दिली गेली नाही, याची चौकशी केली जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT