Shahjahanpur SDM Rinku Singh Rahi Sit Ups Viral Video Cleanliness Initiative esakal
Trending News

IAS Video : चक्क IAS ऑफिसरने आंदोलन करणाऱ्या वकिलासमोर मारल्या उठाबशा, शिक्षेमागचं नेमकं प्रकरण काय? व्हिडिओ व्हायरल..

IAS Rinku Singh Rahi Sit Ups Punishment Viral Video : आयएएस ऑफिसर रिंकू सिंग राही यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर वकिलांनी केलेल्या आंदोलनात स्वतः उठाबशा काढून शिक्षा स्वीकारली. हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Saisimran Ghashi

  • रिंकू सिंग राही यांनी शाहजहानपूरच्या SDM म्हणून पहिल्याच दिवशी स्वच्छतेसाठी अनोखी कृती केली.

  • तहसील परिसरातील अस्वच्छतेची जबाबदारी स्वीकारत त्यांनी स्वतः उठाबशा काढल्या.

  • या घटनेचा व्हायरल व्हिडिओ प्रशासनातील पारदर्शकतेच्या चर्चेला चालना देणारा ठरला.

उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय दंडाधिकारी (SDM) रिंकू सिंग राही यांनी पहिल्याच दिवशी केलेली एक अनोखी कृती चर्चेचा विषय ठरली आहे. मंगळवारी तहसील परिसरात स्वच्छतेच्या मुद्द्यावरून वकील आणि प्रशासनात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत राही यांनी स्वतः शिक्षा स्वीकारली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास वाढवण्यासाठी अशा पावलांची गरज आहे का, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सुरू झाला वादमंगळवारी सकाळी राही यांनी तहसील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना काही व्यक्ती उघड्यावर लघुशंका करताना दिसल्या. तहसील परिसरात शौचालयाची सुविधा उपलब्ध असताना असे कृत्य करणाऱ्यांना त्यांनी तात्काळ शिक्षा म्हणून उठा बशा (sit-ups) काढल्या.

या कारवाईदरम्यान एका वकिलाच्या लिपिकालाही अशाच प्रकारे शिक्षा देण्यात आली. यावरून स्थानिक वकिलांनी आक्षेप घेत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. वकिलांचा रोष पाहता परिस्थिती तणावपूर्ण बनली.

वकिलांच्या निषेधाला सामोरे जाण्यासाठी राही यांनी एक अनपेक्षित पाऊल उचलले. त्यांनी तहसील परिसरातील अस्वच्छतेची जबाबदारी स्वीकारत स्वतः उठाबशा काढल्या. “परिसर स्वच्छ नसल्याची जबाबदारी माझी आहे. जर चुकी झाली असेल, तर मीही शिक्षा भोगायला तयार आहे,” असे सांगत त्यांनी वकिलांसमोरच उठाबशा काढल्या.. या अनपेक्षित कृतीमुळे वकिलांचा राग शांत झाला आणि त्यांनी आपला निषेध मागे घेतला. राही यांनी सांगितले की, त्यांचा उद्देश केवळ स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे आणि प्रशासन व जनता यांच्यातील दरी कमी करणे हा होता.

व्हायरल व्हिडिओ आणि समाजमाध्यमांवर चर्चाराही यांनी स्वतः शिक्षा स्वीकारल्याचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रशासकीय अधिकारी, वकील आणि सामान्य नागरिकांमध्ये यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी राही यांच्या नम्रपणाचे आणि जबाबदारी स्वीकारण्याच्या वृत्तीचे कौतुक केले, तर काहींनी उघड्यावर शिक्षा देण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी जनतेशी संवाद साधला तर प्रशासनावरील विश्वास नक्कीच वाढेल,” असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. तर काहींनी अशा शिक्षेची पद्धत चुकीची असल्याचे म्हटले आहे.

FAQs

  1. What prompted Rinku Singh Rahi to perform sit-ups publicly?
    रिंकू सिंग राही यांनी सार्वजनिकपणे उभ्या राहून व्यायाम का केला
    ?
    तहसील परिसरातील अस्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि वकिलांचा निषेध शांत करण्यासाठी राही यांनी हा अनोखा निर्णय घेतला.

  2. Why did the lawyers protest against the SDM’s actions?
    वकिलांनी SDM च्या कृतीविरुद्ध निषेध का केला?

    एका वकिलाच्या लिपिकाला उघड्यावर लघुशंका केल्याबद्दल शिक्षा देण्यात आली, ज्यामुळे वकिलांनी आक्षेप घेत निषेध व्यक्त केला.

  3. What was the purpose of Rahi’s sit-up gesture?
    राही यांच्या उभ्या राहून व्यायामाच्या कृतीचा उद्देश काय होता?

    स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे आणि प्रशासन व जनता यांच्यातील विश्वास वाढवणे हा त्यांचा उद्देश होता.

  4. How did the public react to the viral video of the incident?
    या घटनेच्या व्हायरल व्हिडिओवर जनतेची प्रतिक्रिया काय होती?

    काहींनी राही यांच्या नम्रपणाचे कौतुक केले, तर काहींनी उघड्यावर शिक्षा देण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

  5. Will such actions by officers improve public trust in administration?
    अधिकाऱ्यांच्या अशा कृतीमुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास वाढेल का?

    अशा कृतीमुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होऊ शकते, पण त्याची योग्यता परिस्थितीवर अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT