Viral News
Viral News esakal
Trending News

Viral News: मानलं पठ्ठ्याला! २४ तासात परत मिळवला घालवलेला जॉब, नेमकं काय केलं त्याने?

सकाळ डिजिटल टीम

Talent News: स्वत:च्या कर्तुत्वावर कायम अभिमान बाळगणारा काइल मॅक्कनने (Kyle McCann) कमालच केली. बॉसच्या म्हणन्यावरून राजीदामा दिला तर खरा पण अवघ्या २४ तासाच्या आत बॉसला त्याच कंपनीत परत नोकरीवर घेण्यास त्याने भाग पाडले. मॅक्कन हा २६ वर्षीय तरूण यूएसमधील एका पेमेंट टेक्नॉलॉजी सोल्युशन डिझाईन करणाऱ्या एका VizyPay कंपनीत नोकरीला आहे.

स्टार्टअप कंपनीमध्ये जॉईन होणारा तो दुसराच कर्मचारी होता. पहिल्या दोन महिन्यातच या तरूणाने अनेक खात्यांवर स्वाक्षरी करत त्याच्या कंपनीतील नवीन भूमिकेत काम केले. सुरूवातीला त्याला त्याची नोकरी ही जगातली सर्वात सोपी नोकरी आहे असे वाटायचे. काही काळाने मात्र या कंपनीचा व्यवसाय मंदावला. मॅक्कनने कंपनीसाठी कुठलेही नवे खाते उघडले नाही. अखेर एका शुक्रवारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

मॅक्कनला ऑफिसमधून काढून टाकण्यात येणार असल्याची कल्पना त्याला आधीच होती. पण त्या बैठकीत सकारात्मक दृष्टिकोण घेऊन जाण्याचे त्याने मनात ठरवले होते. मॅक्कनचा त्याच्या बॉससोबतच्या मीटिंगमध्ये पहिला विचार होता की तो पुढच्या महिन्यात भाडे कसे देणार आहे. नुकताच तो त्याच्या मित्रांसह नवीन अपार्टमेंटमध्ये राहायला गेला होता. त्याला कामावरून काढून टाकल्याचे सांगितल्यानंतरही तो बराच वेळ शांत राहिला. बॉसने दिलेल्या संधीबाबत त्याने बॉसचे आभार मानले.

VizyPay मधील त्याच्या अनुभवातील सकारात्मक घटकांवर प्रकाश टाकत त्याने त्याच्या कामगिरीबद्दल अभिप्राय विचारला. तेव्हा त्याचा बॉस अगदी विनम्र होता. मॅक्कन अयशस्वी का झाला याबद्दल मॅक्कनने काही कारणे दिलीत नाहीत. त्याने स्वत:लाच जबाबदार धरले की ही नोकरी त्याच्यासाठी नव्हती. मात्र हे स्वीकार करण्याचं धाडस बऱ्याच लोकांमध्ये नसते. विशेषत: जेव्हा त्यांना काढून टाकल्या जातं.

पुढे त्याच्या बॉसने त्याला अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले की ज्या पोजिशनवर तुला घेण्यात आलं आलं होतं तिथे तुला काम जमलं नाही म्हणून तुला आता या पोजिशनवरून हलवत आम्ही तुला याच कंपनीत दुसऱ्या पोजिशनवर घेतोय असं सांगण्यात आलं. हे सगळं फक्त मॅक्कनच्या पॉझिटीव्ह आत्मविश्वासामुळे शक्य झालंय. मॅक्कनच्या नुसत्या पॉझिटीव्ह अप्रोचमुळे त्याने घालवलेली जॉब परत मिळवली. त्याच्या या कलेची दादच द्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT