model ceyda ersoy got hospitalized after first kiss gone wrong on date needed surgery on her tongue 
Trending News

Viral News : असा कुठं किस असतो? गर्लफ्रेंडच्या जिभेला टाके घालताना डॉक्टराच्या तोंडाला फेस

सकाळ डिजिटल टीम

आयुष्यातलं पहिलं प्रेम आणि पहिलं चुंबन कुणीही कधीच विसरू शकत नाही. ही भावना आपल्या आठवणींमध्ये नेहमीच ताजी असते. 'फर्स्ट किस'ची क्रेझ खूप असते, मान्य पण ही क्रेझ तुर्की मॉडेलला खूप महागात पडल्याचे दिसून आले. पहिल्या डेटवर आलेला अनुभव फारच विचित्र आहे.

उत्साहात या मॉडेलच्या जोडीदाराने एवढ्या जोरात किस केलं की तिची जीभच कापली गेली. हा प्रकार इतका गंभीर होता की तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. मॉडेलने संपूर्ण प्रकरण तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलं आहे. तिची ही इंस्टाग्राम पोस्ट आता व्हायरल झाली आहे.

34 वर्षांची तुर्की मॉडेल सेडा इर्सोय (Ceyda Ersoy)ने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात सांगितले की ती पहिल्या डेटला गेली होती. फ्रेंच किस करतेवेळी दोघेही प्रेमात वाहून गेले. दरम्यान, तिच्या जोडीदाराने उत्साहाच्या भरात इतक्या जोरात किस घेतला की तिची जीभच कापली गेली आणि रक्त वाहू लागलं.

मॉडलने सांगितलं की, मला आपत्कालीन परिस्थितीमुळं रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली. सेडा म्हणाली, कदाचित मी पहिली व्यक्ती आहे जिची चुंबन घेताना जीभ कापली गेली असेल. हा काही विनोद नाही. खूप त्रास होतो.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, एर्सोईने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आणि म्हटले की, मित्रांनो, मी आता बरी आहे, तुमच्या शुभेच्छांसाठी तुमचे खूप खूप आभार, कोणतीही गुंतागुंत न होता ऑपरेशन पूर्ण झाले आणि डॉक्टरांनी जिभेचे टाके घातले आहेत. काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे. दरम्यान या मॉडेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डॉक्टर टाके घालत असल्याचा व्हिडीओ देखील पोस्ट केल आहे.

तिच्या डेटचा संदर्भ देत सेडा म्हणाली की कदाचित त्याला फ्रेंच किस करावं हे माहित नसेल. त्यामुळेच गडबड झाली. मला असे वाटते की मी त्याला फारसे ओळखत नाही कारण आम्ही पहिल्यांदा भेटून फक्त एक महिना झाला आहे. असंही तिने सांगितलं आहे.

सेडा एर्सोई ही तुर्कीची मॉडेल आहे आणि ती तुर्की 2010 मिस फोटोमॉडेल स्पर्धेची विजेती आहे. इंस्टाग्रामवर तिचे 620,000 फॉलोअर्स आहेत. तिची बहीण इसरा, 37, देखील एक इंस्टाग्राम स्टार आहे. तिचे 398,000 फॉलोअर्स आहेत. सेडाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT