Plane crash on Italian highway, two dead, video goes viral esakal
Trending News

Plane Accident Video : रस्त्यावर गाड्यांची वर्दळ अन् मधोमध कोसळलं विमान; झाला भीषण स्फोट; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Plane Crashed on Italy Highway Video : इटलीतील ब्रेशिया येथे अल्ट्रालाइट विमान महामार्गावर कोसळल्याने भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Saisimran Ghashi

  • ब्रेशिया येथे लहान विमान महामार्गावर कोसळून भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला.

  • विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला होता.

  • संपूर्ण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चौकशी सुरू आहे.

Italy Highway Plane Crash Video : उत्तर इटलीमधील ब्रेशिया शहराजवळ मंगळवारी घडलेल्या एका भयानक विमान दुर्घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. वर्दळीच्या महामार्गावर एक छोटं अल्ट्रालाइट विमान कोसळलं आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी भीषण होती की परिसरात काही क्षणातच धमाका झाला, आगीचे लोट आणि काळ्या धुराचे लोट उठले. या थरारक दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मृतांमध्ये मिलान येथील 75 वर्षीय अनुभवी वकील आणि पायलट सर्जियो रवाग्लिया यांचा समावेश असून, त्यांच्या सोबत प्रवास करत असलेल्या 60 वर्षीय अॅन मारिया डी स्टेफानो यांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघं अल्ट्रालाइट "फ्रेसिया आरजी" या इटालियन बनावटीच्या विमानातून प्रवास करत होते.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगसाठी महामार्ग निवडला होता. मात्र विमानावरचा ताबा सुटल्याने ते थेट रस्त्यावर कोसळले आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला.

व्हिडिओमध्ये दिसतं की विमान प्रचंड वेगात खाली येतं आणि रस्त्याला धडकताच मोठा स्फोट होतो. या स्फोटात विमान पूर्णपणे जळून खाक झालं. हे विमान कार्बन फायबरपासून बनवलेलं असून त्याचे विंग सुमारे 30 फूट लांब होते. आगीने विमानाची अक्षरशः राख केली.

या दुर्घटनेदरम्यान महामार्गावरून जात असलेले दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. मात्र त्यांचा जीव थोडक्यात वाचला, ही बाब सुदैवाची म्हणावी लागेल. सुदैवाने विमान इतर कोणत्याही वाहनावर कोसळले नाही, अन्यथा मृतांचा आकडा आणखी वाढला असता. अपघातानंतर काही मिनिटांतच आपत्कालीन सेवा रस्त्यावर दाखल झाली. मात्र स्फोट इतका तीव्र होता की काहीही कळण्यास वेळ मिळाला नाही.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी इटलीची नॅशनल एजंसी फॉर फ्लाइट सेफ्टीने एक तज्ञ पथक ब्रेशिया येथे पाठवले आहे. त्याचबरोबर ब्रेशिया प्रॉसिक्यूटर्स ऑफिसनेही यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.

ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक असून विमान प्रवासातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत तांत्रिक अडचणींवर नियंत्रण ठेवणे किती अवघड असते, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. सध्या संपूर्ण इटलीमध्ये या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

FAQs

1.ही दुर्घटना कुठे घडली?
ही दुर्घटना इटलीतील ब्रेशिया शहराजवळील महामार्गावर घडली.

2.मृत व्यक्ती कोण होत्या?
मृतांमध्ये ७५ वर्षीय पायलट सर्जियो रवाग्लिया आणि ६० वर्षीय अॅन मारिया डी स्टेफानो यांचा समावेश आहे.

3.विमान कोसळण्याचे कारण काय होते?
विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला.

4.या अपघातात आणखी कोणी जखमी झाले का?
उत्तर: हो, दोन दुचाकीस्वार जखमी झाले, पण त्यांचा जीव वाचला.

5. अधिकृत चौकशी कोणी करत आहे?
इटलीची नॅशनल एजंसी फॉर फ्लाइट सेफ्टी आणि ब्रेशिया प्रॉसिक्यूटर्स ऑफिस चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : खराडीत आलिशान फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी, ३ महिला अन् २ पुरुषांना घेतलं ताब्यात

Kolhapuri Chappal Trade : मोदी सरकारचं कोल्हापुरी चप्पलसाठी मोठं पाऊल, दहा हजार कोटींचा व्यापार होणार!

Maharashtra Politics : राज्याची दीडशे दिवसांत सर्वाधिक बदनामी : सुप्रिया सुळे

Kolhapur Weather Update : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज; पंचगंगेच्या पाणी पातळीत साडेचार फुटांनी वाढ

Maharashtra Rain Update : आजही मुसळधार कोसळणार; राज्यातील 'या' जिल्हयांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT