viral video shows Police Officer eyewear threatening shopkeeper over payment esakal
Trending News

Police Officer Video : वर्दीचा माज एकदम वाईट! चष्म्याच्या दुकानात जाऊन पोलिस अधिकाऱ्याने केलं धक्कादायक काम; व्हिडिओ फुटेज व्हायरल

viral video shows Police Officer eyewear threatening shopkeeper over payment : पोलिस अधिकाऱ्याने चष्म्याच्या दुकानातून पैसे न देता चष्मा घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे वर्दीचा गैरवापर आणि सामान्य नागरिकाच्या हक्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Saisimran Ghashi

  • पोलिस अधिकाऱ्याने चष्मा घेतल्यानंतर पैसे न देता धमकी देत दुकानातून निघून गेला.

  • ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

  • नागरिकांनी वर्दीच्या या दुरुपयोगाविरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Police Officer Misbehave Video : सध्या सोशल मीडियावर एका पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानेच कायद्याचा भंग करत एक दुकानदाराची उघडपणे फसवणूक केल्याचे या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.

हा प्रकार एका चष्म्याच्या दुकानात घडला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे अनेकांनी "हा वर्दीचा माज तरी कधी उतरणार?" असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी चष्म्याच्या दुकानात जातो, तिथे तो चष्मे पाहतो, एक निवडतो आणि तो घेतो. मात्र दुकानदार त्याच्याकडे पैसे मागतो तेव्हा पोलिस अधिकारी संतापतो, वाद घालतो आणि धमकी देतो.

दुकानदार शांतपणे पैसे मागण्याचा प्रयत्न करत असतो, पण अधिकारी त्याच्यावर दादागिरी करत, पैसे न देता चष्मा घेऊन तसाच निघून जातो. दुकानदारचा आवाज पोलिसाच्या वर्दीसमोर दाबला जातो.

ही घटना नक्की कुठे घडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु व्हिडीओ @ManojSh28986262 या एक्स (पूर्वी ट्विटर) युजरने शेअर केला आहे. लोकांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींनी या प्रकाराला "वर्दीचा सरळ सरळ गैरवापर" म्हटलं आहे, तर काहींनी सांगितलं की "अशा काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होते.युजर्सनी विचारलं, "आता सामान्य माणसाला स्वतःच्या वस्तूचे पैसे मागण्याचाही अधिकार नाही का?"

FAQs

  1. What is the viral video of the police officer about? / पोलीस अधिकाऱ्याचा व्हायरल व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे?
    👉 हा व्हिडीओ एका पोलीस अधिकाऱ्याचा आहे जो दुकानातून चष्मा घेऊन पैसे न देता निघून जातो.

  2. Where did this incident take place? / ही घटना कुठे घडली?
    👉 याबाबत अजून स्पष्ट माहिती नाही, पण सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

  3. Was the shopkeeper threatened? / दुकानदाराला धमकी दिली का?
    👉 होय, व्हिडीओमध्ये पोलिस अधिकाऱ्याने दुकानदाराला धमकावताना स्पष्ट दिसतो.

  4. How did people react on social media? / लोकांनी सोशल मीडियावर कशी प्रतिक्रिया दिली?
    👉 अनेकांनी संताप व्यक्त करत हा वर्दीचा सरळ सरळ गैरवापर असल्याचे म्हटले आहे.

  5. Can such misconduct be reported? / अशा प्रकारचा गैरवर्तन तक्रारीस पात्र आहे का?
    👉 होय, अशा घटना Chakshu Portal किंवा पोलीस विभागाकडे तक्रार करून नोंदवता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Owaisi on Ind vs Pak Cricket match: भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून आता ओवैसीचा संसदेत मोदींना सवाल, म्हणाले..

Nandani Elephant : हत्तीने भावना जिंकल्या! महादेवीला नांदणीतून निरोप, भट्टारकांच्या डोळ्यांत अश्रू; हत्तीणही रडली, संपूर्ण गावात हळहळ

मोठी बातमी! स्मार्ट मीटरमधून भविष्यात जेवढा रिचार्ज तेवढीच वीज; बिल थकल्यास सुरक्षा ठेवीतून वसुली, दररोज वीजेचा वापर किती? मोबाईलवर समजणार, वाचा...

Dharavi Firing: धक्कादायक! धारावीत गोळीबाराची घटना, महिला घरासमोर उभी होती अन् तेवढ्यात...

Pune News : कारगिल युद्धातील सैनिकाच्या कुटुंबीयांवर झुंडशाही; मध्यरात्री सिद्ध करावे लागले नागरिकत्व

SCROLL FOR NEXT