Rabi Lamichhane National Independent Party esakal
Trending News

Nepal Politics : कोण आहेत नेपाळचे 'केजरीवाल'? रबी लामिछानेंनी फोडल्याय बड्या पक्षांना घाम!

भारतात अरविंद केजरीवालांनी मतदारांवर जसा प्रभाव टाकला, तसाच प्रभाव आता नेपाळमध्ये देखील पहायला मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात अरविंद केजरीवालांनी मतदारांवर जसा प्रभाव टाकला, तसाच प्रभाव आता नेपाळमध्ये देखील पहायला मिळत आहे.

Nepal Political News : भारतात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मतदारांवर जसा प्रभाव टाकला, तसाच प्रभाव आता नेपाळमध्ये देखील पहायला मिळत आहे. नेपाळमधील राजकीय पक्ष 'राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष' (National Independent Party) अस्तित्वात येऊन सहा महिनेही उलटले नाहीत. पण, सार्वत्रिक निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये या पक्षाची जबरदस्त कामगिरी पहायला मिळत आहे.

नेपाळ निवडणूक आयोगाच्या (Nepal Election Commission) वेबसाइटनुसार, नेपाळी सभागृहात आरएसपी 165 जागांपैकी 11 जागांवर आघाडीवर आहे. तर, दोन जागा जिंकणाऱ्या नेपाळी काँग्रेस (Nepali Congress) 43 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, सर्वांच्या नजरा नेपाळचे माजी पत्रकार रबी लामिछाने यांच्या पक्षाकडं आहेत, जे अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकत आहेत.

विशेष म्हणजे, 21 जून 2022 रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला नेपाळी काँग्रेस आणि CPN-UML सारख्या मोठ्या पक्षांनंतर तिसरं स्थान मिळताना दिसत आहे. नेपाळमध्ये रविवारी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सात प्रांतीय विधानसभांसाठी मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जवळपास 61 टक्के मतदान झालं आहे. सोमवारी सुरू झालेली मतमोजणी अजूनही सुरू आहे. आरएसपीचं निवडणूक चिन्ह 'घंटी' असून ही घंटी सोशल मीडियावर कहर माजवत आहे आणि मोठ्या पक्षांना घाम फोडत आहे.

National Independent Party

लामिछानेंनी 2013 मध्ये केला होता 'विश्वविक्रम'

जाणकारांचं म्हणणं आहे की, आरएसपीची प्रभावी कामगिरी ही एनसी आणि सीपीएन-यूएमएल सारख्या मोठ्या पक्षांसाठी एक इशारा आहे. नेपाळचे माजी टीव्ही होस्ट रबी लामिछाने (वय 48) यांनी 22 जून 2022 रोजी नोकरीचा राजीनामा दिला. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकारणी म्हणून सहभागी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. लामिछाने यांनी एप्रिल 2013 मध्ये सर्वात प्रदीर्घ 'टॉक शो' होस्ट करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपला विश्वविक्रम करत त्यांनी 62 तासांचा शो होस्ट केला.

सदस्य हीच पक्षाची ताकद

माजी पत्रकार आणि युवा राजकारणी असलेले लामिछाने अनेकदा चर्चेत असतात. 13 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली होती. त्यांच्या पक्षाची विचारधारा 'संवैधानिक समाजवाद' आणि 'सहभागी लोकशाही' आहे. पक्षानं स्पष्ट केलंय की, त्यांची कोणतीही शाखा किंवा संघटना नसून केवळ त्यांचे सदस्य हेच त्यांचे कार्यकर्ते आहेत. लामिछाने यांचा पक्ष रिकॉल इलेक्शन आणि राइट टू रिजेक्शनला पाठिंबा देत आहे.

नेपाळी काँग्रेस आघाडीवर

आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये नेपाळी काँग्रेस आघाडीवर आहे. पक्षानं काठमांडू जिल्ह्यात आपलं खातं उघडलं असून काठमांडू-1 मतदारसंघातून एनपीचे उमेदवार प्रकाश मान सिंह विजयी झाले आहेत. त्यांना 7,140 मतं मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे उमेदवार रवींद्र मिश्रा यांना 7,011 मतं मिळाली आहेत. नेपाळी काँग्रेसला मानग जिल्ह्यातही एक जागा मिळालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT