two boys beat st driver video viral esakal
Trending News

Viral: ओव्हटेकच्या वादातून एसटी चालकाला मारहाण; तापलेल्या तरूणांनी अंगावर चढत... व्हिडिओ व्हायरल

ओव्हरटेकच्या किरकोळ वादातून झालेल्या गंभीर मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

Alibag: ओव्हरटेक केल्याच्या किरकोळ वादातून तापलेल्या तरूणांनी रस्त्यावर राडा करत एसटी चालकाला मारहाण केली. ही घटना पेण तालुक्यातील रामवाडी येथे घडली. यावेळी सदर ठिकाणी हजर असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर शेअर केला. विचित्र मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. पोलीसांनी मारहाण करणाऱ्या दोन्ही तरूणांना ताब्यात घेतलंय.

पनवेल अलिबाग मार्गावरून एसटी ड्रायव्हर एसटी चालवत रामवाडीला पोहोचला. मात्र या ठिकाणी ओव्हरटेकच्या वादातून तरूणांचं ड्रायव्हरसोबत मोठं भांडण उफाळूण आलं. बाईकवरील या दोन तरूणांनी रस्त्यावरच राडा केला. चक्क एसटी ड्रायव्हरच्या अंगावर चढत त्यांनी मारहाण केली. त्यांच्या या विचित्र वागणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या मारहाणीत चालकाला ईजाही झाली.

या कुत्सित प्रवृत्तीच्या तरूणांनी एसटी तरूणाची कॉलर पकडत त्याचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. किरकोळ कारणावरून या तरूणांनी भर रस्त्यावर मोठा वाद निर्माण केलाय. व्हिडिओ बघताच अनेकांच्या तरूणांविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिसून आल्या.

एसटी चालकाला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीसांनी मारहाण करणाऱ्या दोन्ही तरूणांना ताब्यात घेतलंय. भर रस्त्यात एसटी चालकाला मारहाण केल्या प्रकरणी या तरूणांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे अशी मागणी व्हिडिओ बघणाऱ्या अनेकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT