Alians On Earth
Alians On Earth esakal
Trending News

Alians On Earth: अबब! डिसेंबरमध्ये पृथ्वीवर खरंच अवतरणार का एलियन? या दाव्यानं केलं साऱ्यांनाच हैराण

सकाळ डिजिटल टीम

Alian News: एलियनचं नाव ऐकताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एलियन्स आठवतात ते हृतिकच्या 'कोई मिल गया' या सिनेमातील. मात्र खऱ्या आयुष्यात आपल्या पृथ्वीवर एलियन येणार हे कळलं तर निश्चितच तुम्ही चकीत व्हाल. होय! आता एलियन पृथ्वीवर अवतरणार असल्याची चर्चा आहे. एका स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरने पृथ्वीवर एलियन उतरणार असल्याचा दावा केलाय. या बातमीने सर्वच हैराण झाले आहेत.

डिसेंबरमध्ये पृथ्वीवर अवतरणार एलियन

एनो अलारिक या (Eno Alaric) व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) असल्याचा दावा केला आहे. एनो अलारिक स्वत: टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करतो. त्याने याबाबत टिक टॉकवर अनेक भविष्यवाण्याही केल्या आहेत. या भविष्यवाणीतील एक भविष्यवाणी म्हणजे एलियन पृथ्वीवर अवतरणार आहे. डिसेंबर महिन्यात एलियन पृथ्वीवर येऊन मानवाशी संवाद साधेल असाही दावा त्याने त्याच्या भविष्यवाणीत केलाय. तसेच त्यांच्या दाव्यानुसार एका विशाल युएफओमधून एलियन ८ डिसेंबरला पृथ्वीवर येतील.

काय सांगतो एनोचा दुसरा दावा

त्याने दुसरा दावा असा केलाय की, मार्च २०२३ मध्ये मोठा उल्का वर्षाव होईल. एनो अलारिकच्या दाव्यानुसार मार्च 2023 मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर 750 फूट परिसरात मोठा उल्का वर्षाव (Meteror Garden) होईल, असा अंदाजही त्याने वर्तवला आहे.

टाईम ट्रॅव्हलर किंवा टाईम ट्रॅव्हलिंगचा अर्थ काय?

टाईम ट्रॅव्हलर म्हणजे वर्तमानातून भूतकाळात किंवा भविष्यकाळात प्रवास करणे. तुम्ही हॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये टाईम ट्रॅव्हलिंग ऐकलं असेल. अनेक चित्रपटांमध्ये टाईम मशिनचाही उल्लेख दिसून येतो. त्यानुसार हिरो हिरोईनजवळ भूतकाळात किंवा भविष्यकाळात प्रवास करत ते घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनांची माहिती देतात. मात्र खऱ्या आयुष्यात बोलायचं झाल्यास टाईम मशीन, टाईम ट्रॅव्हलर, टाईम ट्रॅव्हलिंग या काल्पनिक संकल्पना मानल्या जातात, कारण याबाबतचे ठोस पुरावे अजूनही सापडले नाहीत.

खरंच एलियन आहे का?

एलियनबाबत अनेक तर्क वितर्क केले जातात. शास्त्रज्ञांकडूनही यावर संशोधन सुरू आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत अजूनही कुठलेच पुरावे सापडलेले नाहीत. मात्र अनेक वेळा एलियनबाबत चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतात. त्यामुळे एलियन खरंच पृथ्वीवर अवतरणार आहे काय याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहातं.

UFO म्हणजे काय?

UFO म्हणजे Unidentified Flying Object अर्थात अज्ञात उडणारी वस्तू. हवेत उडणारी अज्ञात वस्तू ज्याची कोणतीही ओळख नाही याला उडत्या तबकड्याही (Space Ship) असंही म्हणतात. मात्र याबाबत अधिकृत माहिती कुठेही नाही. अनेक वेळा UFO दिसल्याचे दावेही केले गेले. त्यामुळे शास्त्रज्ञही यावर अधिक संशोधन करताय.

अनेकांच्या दाव्यानुसार UFO एलियनच्या जगातून येतात. UFO म्हणजे उडत्या तबकड्या. हे एलियन्सच्या प्रवासाचं साधन असल्याचा दावा करण्यात येतो. कोई मिल गया या चित्रपटात तुम्हाला हे दृष्यही बघायला मिळेल. तबकड्यांतून एलियन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. शास्त्रज्ञांच्या मते अजूनही याबाबतचे अधिकृत पुरावे सापडलेले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT