वजन कमी करण्यासाठी आणि हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी जिममध्ये ट्रेडमिलचा वापर तुम्ही केला असेल पण याच ट्रेडमिलवरचा डान्स कधी पाहिलात का? खरंतरं डान्स हा देखील आरोग्यासाठी चांगला व्यायाम आहे, पण तो थेट ट्रेडमिलवर!
ट्रेडमिलवर डान्स करणाऱ्या एका तरुणाचा भन्नाट व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्याच्या टॅलेंटला सलाम करालं. (Treadmill Dance Viral Video If you watch a this video you will forget to exercise)
खरंतरं हा व्हिडिओ म्हणजे रिल्स असून तो @alok_speed_b_boy या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवर अशा प्रकारचे अनेक ट्रेडमिल डान्सचे व्हिडिओ असून ते ही तुम्ही पाहाल तर तुमची तब्येतच खूश होईल.
या व्हिडिओमध्ये एक तरुण सुरुवातीला ट्रेडमिलवर धावताना दिसतो नंतर तो हळूहळू डान्सच करायला लागतो. बरं हा डान्सही उगाच चित्रविचित्र नाही तर अत्यंत लयबद्ध असा बरं का! त्याचमुळं या डान्सचा प्लॅटफॉर्म अन् हटके परफॉर्मन्स याच्या तुम्ही अक्षरशः प्रेमात पडता.
पण हा डान्स पाहताना तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो जरुर घ्या पण तसा प्रयत्न करण्याच्या फंदात पडू नका. कारण हे खूपच धोकादायक आहे. जर तुम्ही ट्रेडमिल सुरु करुन डान्सचा पयत्न करायला गेलात तर ट्रेडमिलवर पडाल आणि तुम्हाला गंभीर इजाही होऊ शकते. त्यामुळं हा व्हिडिओ केवळ मनोरंजन म्हणून पहायला हरकत नाही, पण तसा प्रयत्न चुकूनही करु नका!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.