Viral News esakal
Trending News

Viral News : एका DNA टेस्टनं त्याच्या हॅप्पी मॅरिड लाइफची 18 वर्ष उध्वस्त केली! नेमकं काय घडलं?

एका DNA टेस्टने या व्यक्तीच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. नेमकं काय घडलं याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Viral News : एका व्यक्तीच्या वयक्तिक आयुष्यातील एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. DNA टेस्ट बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. एखाद्याच्या बायोलॉजीकल आयडेंटीटीचा शोध यावरून लावता येतो. मात्र याच टेस्टने या व्यक्तीच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. नेमकं काय घडलं याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

व्यक्तीच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झालीय. मात्र एका डीएनए टेस्टनं त्याच्या सुखी संसाराची राखरांगोळी केली. ज्या पत्नीवर त्याचे जीवापाड प्रेम होते आता तिच्या चेहरा बघण्याचीही त्याला इच्छा नाही.

संबंधित व्यक्तीस ट्विन्स मुले आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्याला अलीकडेच तो या मुलांचा बायोलॉजीकल बाप नसल्याचे कळले. हे कळल्यानंत जेव्हा त्याने त्याच्या पत्नीला जाब विचारला तेव्हा तिच्याकडून मिळालेल्या उत्तराने तो हैराण झाला. हे दोघे पती पत्नी एकमेकांना वीस वर्षापासून ओळखतात. यांनी सोबतच एक छोटासा बिजनेस सुरू केला होता. यांच्या लग्नाला आता अठरा वर्षे झालीत.

त्यांनी स्वत:ची कंपनी उघडल्यानंतर एका वर्षाने लग्न केलं. मात्र लग्नाच्या दोन महिन्यानंतर त्या दोघांत भांडण झालं आणि ती घरून निघून गेली. दोन आठवड्यांनी ती परत आली. दोघांचं भांडणसुद्धा मिटलं. याचदरम्यान ती प्रेग्नेंट असल्याचं कळलं. तिने ट्विन्स मुलांना जन्म दिला. पती पत्नीचा पुढे सुखी संसार सुरु होता.

मिररच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या जीवनात बरेच चढ-उतार आलेत मात्र दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. मात्र डीएनए रिपोर्टने पतीचा विश्वासच उडाला. डीएनए रिपोर्टनंतर त्याला कळले की तो या मुलांचा बायोलॉजिकल बाप नाही.

पत्नीला याबाबत विचारणा केली असता तिने हकीकत सांगितली. लग्नाच्या दोन महिन्यानंतर भांडणात जेव्हा ती घराबाहेर पडली होती तेव्हा नशेत तिने एका अनोळखी व्यक्तीबरोबर संबंध प्रस्थापित केले. तिच्या पत्नीने त्याच्या वयक्तिक आयुष्यातील ही संपूर्ण घटना रेडिट डॉट कॉमवर सांगितली.

पतीला हे सगळं सांगत असताना पत्नी फार रडली असेही तो म्हणाला. तिचा यात काहीही दोष नाही. तो क्षण एका अपघातासारखा होता आणि असंही ती म्हणाली. पतीस हे कळल्यानंतर मात्र तो घरातून निघून थेट हॉटेलमध्ये राहायला घराबाहेर पडलाय. त्याने लोकांना याबाबत सल्लाही मागितलाय. (Married Life)

त्याने लिहीले की, माझं माझ्या बायकोवर फार प्रेम आहे. मात्र सध्या माझी मनस्थिती बरोबर नाही. ती एक चांगली लाइफ पार्टनर आहे. मी तिच्या शिवाय जगू शकत नाही पण यातून पुढे जाण्यासाठी मला मानसिक पाठबळ कसं मिळेल यावर मला सल्ला द्यावा असे तो म्हणला.

त्यावर एका यूजरने त्याला दिलासा देत असा रिप्लाय दिलाय की स्वत:कडे लक्ष दे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी नात्याला थोडा वेळ द्यावा लागेल. काही काळाने सगळं नीट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT