viral video sakal
Trending News

Viral Video: कांदा, मुळा अन् भाजी, जर्मन सूनबाई माझी!

जर्मनीवरुन भारतात आलेली सून एका गावात कांद्याची लागवड करत आहे.

निकिता जंगले

तुम्ही अनेकदा विदेशी मुलांमुलींचा देसी लुक बघितला असेल. खरं तर भारतातील मुलं परदेशात शिकायला जातात आणि तेथून विदेशी सुन घेऊन येतात, असे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सोशल मीडियावरही याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये जर्मनीवरुन भारतात आलेली सून एका गावात कांद्याची लागवड करत आहे. (Viral Video of German daughter in law who plants onions in farm)

हा व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये तुम्हाला दिसेल की एक विदेशी सुन देसी अंदाजमध्ये शेती करत आहे. या विदेशी महिलेने भारतीय संस्कृतीनुसार भांगेत कुंकू भरलंय आणि ती शेतात बसून कांद्याची लागवड करत आहे. तिला असं काम करताना बघून व्हिडीओ बनविणारा व्यक्ती तिला काही प्रश्न विचारतो आणि ती त्याची दिलखूलासपणे उत्तरे देते.

व्हिडियो बनविणारा व्यक्ती तिला विचारतो की मी तुला विचारू शकतो का ? त्यावर ती हिन्दी मध्ये उत्तर देते ‘हां जरूर’. त्यानंतर तो व्यक्ती विचारतो तुम्ही कुठून आला आहात? त्यावर ती म्हणते ‘मैं जर्मनी से हूं’ और यहां खेत में प्याज लगा रही हूं." त्यावर तो पुढे विचारतो की तुम्ही जर्मनीवरुन भारतात कांद्याची लागवड करायला आला आहात? त्यावर ती महिला हसते.

कांद्याची लागवड करताना मजा येत असल्याचे ती महिला म्हणते. या दरम्यान दूर उभी असलेली जर्मन सुनबाईची सासू हसताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. सोबतच हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून या व्हिडीओला भरपूर लाईक्स आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT