Viral Video esakal
Trending News

Viral Video : 'सामी सामी...' गाण्याची क्रेझ, चिमुकल्यांनाही लागलंय वेड

एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक छोटीशी क्युट मुलगी “सामी सामी” गाण्यावर नाचतीये.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : साऊथचे सिनेमे आणि त्यातल्या उडत्या चालीच्या गाण्यांची क्रेझ कायमच सगळ्यांचे पाय थिरकवते. सध्या पुष्पा सिनेमातल्या 'मै झुकेगा नहीं साला...'चे वेड सगळ्यांनाच लागलं आहे. अगदी गणेशोत्सवातल्या गणपती बाप्पालाही पुष्पाच्या रूपात बघायला मिळालं. असंच वेड त्यातल्या 'सामी सामी...' गाण्याने लावलं आहे.

कालपासून सामी सामी गाण्यावरचा चिमुकल्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शाळकरी मुलं या गाण्यावर भन्नाट डांस करताना दिसत आहेत. यात एक छोटीशी क्युट मुलगी “सामी सामी” गाण्यावर नाचतीये. हा व्हिडीओ व्हायरल होत होत रश्मिका मंदाना पर्यंत जाऊन पोहचला. रश्मिका मंदानाने या मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिने तिच्या ट्विटर हॅन्डलवर ही पोस्ट शेअर केलीये.

हा व्हिडिओ ३१ सेकंदाचा आहे. बहुतेक ही एखादी शाळा असावी. ‘सामी-सामी’ हे गाणं मोठ्या आवाजात वाजताना ऐकू येतं. बाकीची मुलं उड्या मारताना नाचताना दिसतायत.

कॅमेऱ्यासमोरची एक मुलगी रश्मिका मंदानाच्या स्टेप्स इतक्या सुंदरपणे फॉलो करते की बघणारे तिच्याकडे टक लावून बघत राहतात. हा व्हिडीओ तुम्हालाही पुन्हा पुन्हा नक्की बघायला आवडेल. या छोटुश्या मुलीचे हावभाव खूप क्यूट असतात. हा व्हिडिओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला हे समजू शकलेले नाही.

अभिनेत्री रश्मिका मंदानाने काल या चिमुकलीचा डान्स व्हिडिओ शेअर करत लिहिले- “मेड माय डे… मला ह्या क्यूटीला भेटायचे आहे… मी तिला कुठे भेटू शकते?”

या व्हायरल क्लिपला जवळपास १८ लाख व्ह्यूज आणि ९२ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक ट्विटर युझर्सनी यावर प्रतिक्रिया देत लिहिले की, “या मुलीनेही आमचा दिवस छान बनवला आहे.” काही युझर्सनी मुलीचा डान्स परफेक्ट आणि क्यूट असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT