Child Marriage
Child Marriage esakal
उत्तर महाराष्ट्र

Child Marriage News : ऑपरेशन अक्षतांतर्गत 75 दिवसांत रोखले तब्बल 20 बालविवाह

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जिल्हा पोलिस दलातर्फे सुरू करण्यात आलेली ऑपरेशन अक्षता मोहिमेची फलश्रुती दिसू लागली आहे.

पोलिस दलाने जिल्ह्यात या मोहिमेच्या माध्यमातून ७५ दिवसांत २० बालविवाह रोखून समाजातील अनिष्ठ रूढीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आहे. (20 child marriages prevented in 75 days under Operation Akshat Performance of Nandurbar Police Not only in curbing crime but also top in social activities Nandurbar News)

अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित यांना पोलिस ठाणे हद्दीतील रामपूर गावात १ जूनला अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविल्याने त्यांनी हा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलाच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशित केले.

त्याप्रमाणे अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित यांनी अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने रामपूर गावात जाऊन विवाह थांबविण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे व गावातील नागरिकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करून मनपरिवर्तन केले.

अल्पवयीन मुलाच्या पालकांना ही बाब पटल्याने त्यांनी मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

अल्पवयीन मुलाच्या पालकांना अक्कलकुवा पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता मोहिचे कौतुक होत आहे. ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतरदेखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंतयांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित, पोलिस नाईक अतुल गावित, किशोर वळवी, खुशाल माळी यांनी केली.

६३१ ग्रामपंचायतींमध्ये ठराव

आजपावेतो नंदुरबार जिल्ह्यातील ६३४ पैकी ६३१ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाहविरोधी ठराव घेण्यात आले आहेत. उर्वरित तीन ग्रामपंचायतींचे ठरावदेखील लवकरच घेण्यात येतील.

वीस बालविवाह रोखण्यात यश

आजपावेतो नंदुरबार जिल्हा पोलिसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत ७५ दिवसांत तब्बल २० बालविवाह रोखण्यात यश आले, असे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT