Queue of voters for voting. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Market Committee Election : तिन्ही बाजार समित्यांसाठी 99 टक्के मतदान; आज मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या यंदाच्या नंदुरबारसह शहादा व नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. (99 percent voting for all 3 market committee nandurbar news)

तिन्ही बाजार समित्यांसाठी सरासरी ९९ टक्के मतदान झाले. मतदारांनी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान केंद्रावर स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, त्या-त्या तालुकास्तरावर शनिवारी (ता. २९) मतमोजणी होणार आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्तासह प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्ह्यातील सहापैकी अक्कलकुवा, तळोदा व धडगाव या तीन बाजार समित्यांच्या संचालकांची उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी प्रत्येकी १८ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने या तिन्ही बाजार समित्या त्याच दिवशी बिनविरोध निवड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मात्र जिल्ह्यातील महत्त्वाची असलेल्या नंदुरबार, पाठोपाठ शहादा व नवापूर या तिन्ही बाजार समित्यांसाठी अत्यंत चुरशीच्या लढती रंगल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दरम्यान, शुक्रवारी तिन्ही बाजार समित्यांसाठी मतदान घेण्यात आले.

मतदानासाठी सकाळी आठपासूनच मतदारांनी हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. नंदुरबार बाजार समितीसाठी दोन हजार ७२७ पैकी दोन हजार ६६९ मतदारांनी हक्क बजावला. त्यामुळे ९७.८७ टक्के मतदान झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नंदुरबार बाजार समितीसाठी मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान असे (टक्क्यांत) ः रनाळा ९९ टक्के, शनिमांडळ १०० टक्के, आष्टे १००, खोंडामळी ९९ टक्के, कोरीट १००, नंदुरबार ९८, धानोरा १०० टक्के.

बाजार समितीनिहाय मतदानाची टक्केवारी ः नंदुरबार ९७.८७, शहादा ९६.८२, नवापूर ९७.६६.

शहादा बाजार समितीकडे लक्ष

गेल्या दोन महिन्यांपासून चुरस रंगलेल्या बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले असले, तरी उद्याच्या निकालाकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. यंदा बाजार समितीच्या निवडणुका नेत्यांनी प्रतिष्ठेच्या बनविल्या आहेत.

नंदुरबार, नवापूर येथे आमनेसामने लढती होत्या. मात्र शहाद्यात दीपक पाटील यांच्या विरुद्ध तीन पॅनल पुन्हा निवडणुक रिंगणात उतरले होते. तेथील चौरंगी लढतीमुळे वर्षानुवर्षे दीपक पाटील यांची एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीचा निकाल कसा लागतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT